Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा

Advertisements

चिपळूण : येथील परशुराम एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे येत्या नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांसाठी रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत उमेदवारांना निवडणूक प्रक्रिया, आचारसंहिता, प्रचार धोरण, जनसंपर्क तंत्र, संवादकौशल्य तसेच आधुनिक डिजिटल माध्यमांचा वापर या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

लोकशाही मजबूत होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था ही अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. त्यामुळे उमेदवारांकडे केवळ निवडणूक लढविण्याची तयारी असणे पुरेसे नाही, तर त्यांच्याकडे कायदेशीर माहिती, प्रभावी संवादाची क्षमता आणि समाजाभिमुख दृष्टिकोन असणे गरजेचे आहे. या सर्वांचा समन्वय साधण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.

तज्ज्ञ व्याख्यात्यांच्या मार्गदर्शनातून उमेदवारांना नामनिर्देशन प्रक्रिया, खर्चाचे पारदर्शक नियोजन, लोकांशी थेट संवाद कसा साधावा, सोशल मीडियाचा विधायक वापर कसा करावा, प्रचार यंत्रणा आणि स्वयंसेवक व्यवस्थापन कसे करावे याची सखोल माहिती दिली जाणार आहे. कार्यशाळेत जबाबदार नेतृत्वगुण आणि मतदारांशी विश्वासार्ह नाते निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले जाईल.

कार्यशाळा सोमवार, दि. १५ सप्टेंबर रोजी चिपळूणच्या अभिरुची हॉटेलमध्ये आणि मंगळवार, दि. १६ सप्टेंबर रोजी रत्नागिरीत अंबर हॉलमध्ये सकाळी १० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत होणार आहे.

या कार्यशाळेचे प्रतिव्यक्ती ३००० रुपये शुल्क आहे. हे शुल्क ९१५८१२०१५५ या क्रमांकावर गुगल पेने पाठविता येईल किंवा गुगल फॉर्ममध्ये दिलेल्या स्कॅनर कोडवरूनही शुल्क भरता येईल.

सर्व इच्छुक उमेदवारांनी आपल्याला हव्या असलेल्या शहराच्या दुव्यावर नावनोंदणी करावी, असे आवाहन परशुराम एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सचिव डॉ. मीनल ओक आणि जनजागृती संघाचे अध्यक्ष केशव भट यांनी केले आहे.

नावनोंदणीसाठी अर्ज –
https://forms.gle/3JD3ouN5aNEqjAR4A

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version