फिनोलेक्स अ‍ॅकॅडमीच्या ‘इंडी क्रॉप जिनियस’ अ‍ॅपची कॉपीराइट नोंदणी

रत्नागिरी : येथील फिनोलेक्स अ‍ॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील एमसीए विभागाच्या विद्यार्थ्यांनी एक महत्त्वपूर्ण कामगिरी साध्य केली आहे. या संशोधक विद्यार्थ्यांच्या टीमने विकसित केलेल्या “इंडी क्रॉप जिनियस : प्रिसिजन फार्मिंग विथ एआय इन्साइट” या नावीन्यपूर्ण मोबाइल अ‍ॅप्लिकेशनला भारत सरकारच्या कॉपीराइट निबंधक कार्यालयामार्फत अधिकृत कॉपीराइट नोंदणी प्राप्त झाली आहे.

कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व डेटा-आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना शाश्वत आणि अचूक मार्गदर्शन मिळावे, यासाठी या अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. ‘इंडी क्रॉप जिनियस’ अ‍ॅपमुळे शेतकरी पीक व्यवस्थापन, मातीची काळजी, खतांचा कार्यक्षम वापर आणि हवामानावर आधारित निर्णय अधिक प्रभावीपणे घेऊ शकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

हा संशोधन प्रकल्प तन्मय जोगळेकर, वैभव बागवे, अरमान राऊत यांनी प्रा. वामन राधाकृष्ण परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बनवला आहे. या यशाबद्दल बोलताना संशोधक विद्यार्थ्यांनी सांगितले की, “ही नोंदणी आमच्या संशोधन कार्याची दखल असून यामुळे पुढे समाज आणि शेतकरी बांधवांसाठी अधिक परिणामकारक उपाय विकसित करण्याची प्रेरणा मिळेल.”

या उल्लेखनीय यशाबद्दल फिनोलेक्स अ‍ॅकॅडमीच्या अध्यक्षा डॉ. श्रीमती अरुणा कटारा, मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद, उपप्राचार्य डॉ. मिलिंद यादव, विभाग प्रमुख प्रा. तेजस जोशी आणि अॅकॅडमीच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक प्राध्यापक यांचे अभिनंदन केले.

कोकणातील संशोधक विद्यार्थ्यांचे हे यश सर्वत्र कौतुकास्पद ठरत असून त्यांचे अभिनंदन होत आहे. कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घडणाऱ्या नव्या क्रांतीचे हे प्रतीक असल्याचे मानले जात आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply