तुटपुंज्या साधनांनिशी सायकल सराव करून जिंकला घाटाचा राजा-राणी किताब

खेड : चांगल्या कौटुंबिक आर्थिक परिस्थितीअभावी तुटपुंज्या साधनांच्या वापरातून सायकल सराव करून रत्नागिरी तरुणांनी घाटांचा राजा आणि घाटांची राणी किताब जिंकला. त्यातही दोघा सख्ख्या पालवणकर भावंडांनी पहिला आणि तिसरा क्रमांक पटकावून वेगळाच इतिहास रचला.

नाचणे ग्रामपंचायतीतर्फे मुलांसाठी उन्हाळी शिबिर

रत्नागिरी : रत्नागिरीजवळच्या नाचणे ग्रामपंचायतीन जिल्हा परिषद शाळेच्या सहकार्याने ३ ते १२ वयोगटातील मुलांसाठी विनामूल्य समर कॅम्पचे आयोजन केले आहे. अशा तऱ्हेने मुलांसाठी उन्हाळी शिबिर आयोजित करणारी नाचणे ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

राज्यातील बीचवरील पहिली कुस्ती स्पर्धा २२ मे रोजी रत्नागिरीत

रत्नागिरी : राज्यात पहिल्यांदाच बीचवरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन रत्नागिरीतील मांडवी बीचवर करण्यात येणार आहे. येत्या २२ मे रोजी महिला आणि पुरुष विभागात ही स्पर्धा होईल.

महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे यांच्या स्मारकाचा दापोलीत शुभारंभ

दापोली : महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे यांच्या १४२ व्या जयंतीचे औचित्य साधून जालगाव (ता. दापोली) येथे महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे स्मारक समितीच्या स्मारकाचा काल (दि. ७ मे) प्रारंभ झाला. जालगाव अपना स्वीट्सच्या इमारतीत मुख्य कार्यक्रम झाला.

चिपळूणच्या वाचन मंदिरात पां. वा. काणे यांचा पुतळा

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात भारतरत्न डॉ. पां. वा. काणे यांच्या जन्मदिनी त्यांच्या पुतळ्याचे अनावरण चिपळूण पालिकेचे मुख्याधिकारी आणि प्रशासक प्रसाद शिंगटे यांच्या हस्ते ७ मे रोजी करण्यात आले.

कवी माधव, कवी आनंद पुरस्कार अख्तर दलवाई, मनाली बावधनकर यांना जाहीर

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने दिला जाणारा कवी माधव पुरस्कार अख्तर दलवाई यांना, तर कवी आनंद पुरस्कार सौ. मनाली बावधनकर यांना जाहीर झाले आहेत.