२२ मेपासून रत्नागिरीत एसटी, रिक्षा आणि सलून सुरू होणार

रत्नागिरी : करोनामुळे लागू असलेल्या लॉकडाउनच्या नियमांमध्ये २२ मे २०२०पासून शिथिलता देण्याबाबतचे आदेश रत्नागिरी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी २१ मे रोजी जारी केले. यात जिल्हांतर्गत एसटी बससेवा, तसेच रिक्षा आणि केशकर्तनालये (सलून) यांना विशिष्ट अटींवर परवानगी देण्यात आली आहे.

रत्नागिरीतील परशुरामपंत अभ्यंकर विद्यामंदिरचे १७ विद्यार्थी गुणवत्ता शोध परीक्षेत गुणवत्ता यादीत

रत्नागिरी : सांगली शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या गुणवत्ता शोध परीक्षेत रत्नागिरीतील दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यालयातील १७ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला.

‘शिवसेनेला भरभरून देणाऱ्या कोकणाकडे सरकारचे दुर्लक्ष’

रत्नागिरी :  ‘गेल्या दोन महिन्यांत कोकणात करोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना स्वॅबच्या तपासणीसाठी मिरज येथील प्रयोगशाळेवर अवलंबून राहावे लागत आहे. शिवसेनेला

रत्नागिरीत नवे १६ करोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्येचे शतक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस सातत्याने वाढत असलेल्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काल (१९ मे) १६ जणांना पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले होते; मात्र आज (२० मे) पुन्हा नवे १६ रुग्ण करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या १०८ झाली आहे.

रत्नागिरीतील आणखी १६ रुग्णांना करोनामुक्त झाल्याने घरी सोडले!

रत्नागिरी : गेले काही दिवस सातत्याने रत्नागिरी जिल्ह्यातील करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज (१९ मे) एक दिलासादायक

डॉक्टर आपल्या दारी उपक्रमाचा खेडशीतील २५० नागरिकांना लाभ

रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरीची भारतीय जैन संघटना आणि फोर्स मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज (ता. १८ मे) राबविण्यात आलेल्या डॉक्टर आपल्या दारी उपक्रमाचा खेडशीतील २५० नागरिकांना लाभ झाला.