पर्यटनात लांज्याला मानाचे स्थान मिळवून देऊ या : विजय हटकर

लांजा : कोकणातील निसर्गरम्य लांजा तालुका वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांनी समृद्ध असून कोकण पर्यटनात लांज्याला मानाचे स्थान मिळवून देऊ या, असे आवाहन कोकण पर्यटन अभ्यासक आणि रत्नसिंधु टुरिझमचे संचालक प्रा. विजय हटकर यांनी येथे केले.

उक्षीचे मिलिंद खानविलकर विशेष कार्यकारी अधिकारी

रत्नागिरी : उक्षी गावचे सुपुत्र मिलिंद खानविलकर यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.

आदिपंढरी वालावलच्या नारायणाची माळ पंढरपूरच्या विठोबाच्या गळ्यात

वालावल (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील लक्ष्मीनारायणाच्या अंगावरील वस्त्र आणि तुळशीच्या मंजिऱ्यांची माळ घातल्यानंतरच महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाचा आषाढी एकादशीचा उत्सव सुरू होतो. या लक्ष्मीनारायणाचे मंदिर असलेल्या वालावल गावाला म्हणूनच ‘आदिपंढरी’ म्हणून ओळखले जाते. या मंदिरात आषाढी एकादशीला होणारा उत्सव यंदा करोनामुळे मोजक्या उपस्थितीत होत आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने, हे मंदिर आणि उत्सवाची माहिती देणारा लेख…

आषाढस्य प्रथम दिवसे – मूळ रचना आणि अनुवादांमधलं सौंदर्य

आज आषाढ शुद्ध प्रतिपदा म्हणजेच आषाढाचा पहिला दिवस. हा दिवस कविकुलगुरू कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. मेघदूत हे त्याचं महान काव्य. या काव्याच्या दुसऱ्या श्लोकाची सुरुवात ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ अशी होते. कालिदासाची जन्मतिथी माहिती नसल्याने त्याच्या काव्यातल्या या उल्लेखावरून आषाढाच्या पहिल्या दिवशी कालिदास दिन साजरा केला जातो. त्या निमित्ताने मेघदूताच्या काही अनुवादांविषयी…

‘वानर आणि केल्ड्यांवर उपाय काढा, कोकण समृद्ध होयल’

रत्नागिरी : वानर आणि केल्ड्यांवर उपाय काढा, कोकण समृद्ध होयल, अशा संगमेश्वरी बोलीतील खणखणीत शब्दांत या वन्य प्राण्यांच्या उपद्रवाची कथा आणि शेतकऱ्यांची व्यथा लोककलाकार सचिन काळे यांनी मांडली.

सवतकड्याच्या निमित्ताने चुनाकोळवण!

कोकणातील धबधब्यांचे आकर्षण कोकणाबाहेरील अनेकांना असतेच. अशाच एका धबधब्याचा मनमुराद आनंद लुटणाऱ्या मूळच्या कोकणवासीय चाकरमान्याने केलेले वर्णन निसर्गवेड्यांना त्या धबधब्याकडे घेऊन गेले नाही, तरच नवल!