आंबडवे गावाने आत्मनिर्भरतेसाठी देशाला दिशा द्यावी – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

मंडणगड : भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांचे आंबडवे हे जन्मगाव आत्मनिर्भरतेसाठी देशाला दिशा देणारे ठरावे आणि केंद्र सरकारने बाबासाहेबांच्या स्मृती जपणाऱ्या पंचतीर्थ योजनेमध्ये या गावाचाही समावेश करावा. महाराष्ट्राप्रमाणे ७ नोव्हेंबर हा शाळाप्रवेश दिवस देशभर साजरा केला जावा, अशी अपेक्षा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली.

भारताचे राष्ट्रपती प्रथमच देणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गावाला भेट

मंडणगड : राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या शनिवारी, १२ फेब्रुवारी रोजी आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात आंबडवे (ता. मंडणगड) या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाला भेट देणार आहेत. आंबडवे गावाला भेट देणारे ते पहिलेच राष्ट्रपती ठरणार आहेत.

बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ घरात जिल्हा परिषदेची पहिली बैठक

रत्नागिरी : भारत स्वतंत्र झाल्यानंतर रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक सर्वप्रथम आंबेडकरांच्या मूळ घरात झाली होती, अशी आठवण रत्नागिरी जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी दिली.

महामानवाच्या आंबडवे गावी महापरिनिर्वाणदिनी अभिवादन

मंडणगड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज आंबडवे (ता. मंडणगड) या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पासष्टाव्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यात आले. त्यांच्या स्मारकातील अस्थिकलशापुढे नतमस्तक होण्यासाठी अनुयायांनी रीघ लावली होती.

‘फेरोसिमेंट’ तंत्रज्ञानाने मंडणगड तालुक्यात प्रथमच पर्जन्यजल साठवण

मंडणगड : ‘फेरोसिमेंट’ तंत्रज्ञानाने मंडणगड तालुक्यात कुंबळे गावात प्रथमच ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग टॅँक’ बांधण्यात आली असून त्यासाठी मुंबईच्या जलवर्धिनी प्रतिष्ठानने साह्य केले आहे.