भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या स्वदेशी लशींना मंजुरी; आपत्कालीन वापरासाठी औषध महानियंत्रकांचा हिरवा कंदील

नवी दिल्ली : करोना महामारीच्या प्रतिबंधासाठी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा दोन लशींच्या आपत्कालीन नियंत्रित वापराला भारतीय औषध महानियंत्रकांकडून (डीजीसीआय) अखेर मंजुरी मिळाली आहे. आज (तीन जानेवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे या दोन्ही लशी भारतातच तयार झालेल्या आहेत.

करोनाचे रत्नागिरीत १८, तर सिंधुदुर्गात १२ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दोन जानेवारी) करोनाचे १८ नवे रुग्ण आढळले, तर ११ जण बरे होऊन घरी गेले. सिंधुदुर्गात आज १२ नवे रुग्ण आढळले, तर तीन रुग्ण करोनामुक्त झाले.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात प्रत्येकी ६ नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांत आज (शुक्रवारी) प्रत्येकी नवे ६ करोनाबाधित आढळले. रत्नागिरीत २७, तर सिंधुदुर्गात १४ रुग्ण करोनामुक्त झाले.

रत्नागिरी जिल्ह्यात १५, सिंधुदुर्गात ८ नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (३१ डिसेंबर) नवे १५ करोनाबाधित आढळले, तर १९ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आठ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर २३ रुग्ण करोनामुक्त झाले.

रत्नागिरी जिल्ह्यात ५, सिंधुदुर्गात ४ नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (बुधवारी) नवे ५ करोनाबाधित आढळले, १२ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ४ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ११ रुग्ण करोनामुक्त झाले.

रत्नागिरी जिल्ह्यात १२ नवे करोनाबाधित, २१ करोनामुक्त, सिंधुदुर्गात एकाचा मृत्यू

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (मंगळवारी) नवे १२ करोनाबाधित आढळले, २१ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज २७ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १९ रुग्ण करोनामुक्त झाले. आज सलग दुसऱ्या दिवशी एका रुग्णाचा मृत्यू नोंदविला गेला.