रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (३१ डिसेंबर) नवे १५ करोनाबाधित आढळले, तर १९ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आठ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर २३ रुग्ण करोनामुक्त झाले.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (३१ डिसेंबर) आरटीपीसीआर चाचणीनुसार १०, तर अँटिजेन चाचणीनुसार ५ जण करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. आरटीपीसीआरनुसार रत्नागिरी, चिपळूण आणि गुहागरमध्ये प्रत्येकी १, तर लांज्यामध्ये सात नवे रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले.
अँटिजेन चाचणीत रत्नागिरी व चिपळूण येथे प्रत्येकी दोन, तर गुहागरमध्ये एक रुग्ण आढळला. त्यांच्यासह जिल्ह्यात सध्या ११७ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ४७ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत, तर सर्वाधिक ३८ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात आहेत. या रुग्णांसह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या ९२०६ झाली आहे.
जिल्ह्यात आज १९ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या ८७२८ झाली असून, करोनामुक्तीचा हा दर ९४.८१ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ३२८ असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.५६ टक्के आहे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (३१ डिसेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार कोविड-१९च्या २३ जणांना बरे झाल्यानंतर घरी पाठविण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची जिल्ह्यातील एकूण संख्या ५४९७ झाली आहे. सध्या जिल्ह्यात २२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आठ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ५८८१ एवढी झाली आहे. आज कोणाचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्याची एकूण संख्या १५७ एवढीच असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

