गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई अभंग गायन स्पर्धेत वैभववाडीचे हर्ष नकाशे प्रथम

रत्नागिरी : गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई ऑनलाइन अभंग गायन स्पर्धेत वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील हर्ष नकाशे यांनी विजेतेपद पटकावले. तब्बल २०० स्पर्धकांमधून त्यांनी हे यश संपादन केले. बदलापूर येथील सई जोशी आणि कुडाळ येथील नितीन धामापूरकर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.

‘स्वराभिषेक-रत्नागिरी’ने प. पू. गगनगिरी महाराज भक्त मंडळाच्या संयुक्त विद्यमाने संतरचित अभंग गायनाच्या ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेकरिता रत्नागिरीच्या खल्वायन संस्थेचे प्रायोजकत्व लाभले. स्पर्धेचे यंदा तिसरे वर्ष होते. करोनाच्या संकटामुळे या वर्षी स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने पार पडली.

रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्ग, नाशिक, सांगली, कोल्हापूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी विभागांमधून सहा ते ८५ वर्षांपर्यंतच्या स्पर्धकांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. याशिवाय परदेशातील स्पर्धकही यंदा सहभागी झाले होते. अटलांटा आणि कॅलिफोर्नियातून व्हिडिओ स्पर्धेसाठी सादर करण्यात आले होते.

गोवा येथील दिगंबर गाड यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. अ‍ॅड. राजशेखर मलुष्टे यांनी सोशल मीडियाद्वारे निकाल जाहीर केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल असा –
प्रथम :
हर्ष नकाशे, द्वितीय : सई जोशी, तृतीय : नितीन धामापूरकर

उत्तेजनार्थ : सृष्टी तांबे (सावर्डे, ता. चिपळूण), प्रसाद शिंदे (पोमेंडी खुर्द, रत्नागिरी)

सोशल मीडियाद्वारे मिळालेल्या सर्वाधिक लाइक्सची विजेती : पूर्वा नागवेकर (रत्नागिरी).

स्पर्धा यशस्वी होण्याकरिता प. पू. गगनगिरी महाराज आश्रमाचे राम पानगले, स्वराभिषेक संस्थेच्या संचालिका सौ. विनया परब, त्यांचा शिष्यवर्ग आणि ‘टीम स्वराभिषेक’च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. प्रतिसाद ग्राफिक्सचे सचिन सिधये यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

(विजेत्या स्पर्धकांचे व्हिडिओ सोबत दिले आहेत.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply