रत्नागिरी जिल्ह्यात १२ नवे करोनाबाधित, २१ करोनामुक्त, सिंधुदुर्गात एकाचा मृत्यू

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (मंगळवारी) नवे १२ करोनाबाधित आढळले, २१ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज २७ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १९ रुग्ण करोनामुक्त झाले. आज सलग दुसऱ्या दिवशी एका रुग्णाचा मृत्यू नोंदविला गेला.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज आढळलेले पाचही रुग्ण आरटीपीसीआर चाचणीनुसार निष्पन्न झाले. त्यातील तिघे रत्नागिरीतील, तर दोघे खेडमधील आहेत. त्यांच्यासह जिल्ह्यात सध्या १३७ सक्रिय रुग्ण आहेत. त्यात होम आयसोलेशनमध्ये ६९ जण आहेत, तर सर्वाधिक ३१ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात आहेत. या रुग्णांसह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या नऊ हजार १७४ झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार २, तर अँटिजेन चाचणीनुसार १० रुग्ण निष्पन्न झाले. आरटीपीसीआरनुसार रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला. अँटिजेन चाचणीत रत्नागिरीत ४, दापोलीत १, तर संगमेश्वरमध्ये ५ रुग्ण आढळले. त्यांच्यासह जिल्ह्यात सध्या १२७ सक्रिय रुग्ण आहेत. त्यात होम आयसोलेशनमध्ये ६१ जण आहेत, तर सर्वाधिक ३३ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात आहेत. या रुग्णांसह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या नऊ हजार १८६ झाली आहे.

जिल्ह्यात आज २१ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या आठ हजार ६९७ झाली असून करोनामुक्तीचा हा दर ९४.६७ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ३२८ असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.५७ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे २७ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या पाच हजार ८६६ झाली आहे. सध्या २२९ रुग्ण सक्रिय आहेत. आज १९ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्त झालेल्यांची जिल्ह्यातील एकूण संख्या पाच हजार ४७४ झाली आहे. आज सावंतवाडीतील ५४ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता, असे जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. या मृत्यूमुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १५७ झाली आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply