लांजा-राजापूरमध्ये रविवारपासून साहित्य संस्कृती जागर पदभ्रमण

लांजा : विश्व मराठी परिषद आयोजित साहित्य संस्कृती जागर पदभ्रमण परिक्रमेअंतर्गत पुण्याहून ६० तरुण १६ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत लांजा-राजापूर परिसराचा दौरा करणार आहेत.

जगातील आठवे आश्चर्य असलेल्या अंगकोरवाटमध्ये विष्णू भागवतकथा आणि धर्मयात्रा; अंगकोरवाट भारत फाउंडेशन संस्थेचा शुभारंभ

जगातील आठवे आश्चर्य आणि सर्वांत मोठे मंदिर असलेल्या कंबोडियातील अंगकोरवाट परिसरामध्ये नुकतेच विश्व मंदिर परिषदेद्वारा पहिल्यावहिल्या विष्णू भागवतकथेचे आयोजन करण्यात आले होते. श्रीरामजन्मभूमी न्यास अयोध्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांच्या अमृतमय वाणीने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

माहितीचा अधिकार कायदा ऑनलाइन कार्यशाळा

पुणे : येथील विश्व मराठी परिषदेने बनण्याकरिता माहितीचा अधिकार कायदा ऑनलाइन कार्यशाळा आयोजित केली आहे.

विश्व मराठी परिषदेतर्फे वेरवलीत साहित्य संस्कृती जागर शिबिर

रत्नागिरी : पुण्यातील विश्व मराठी परिषदेतर्फे रत्नागिरी जिल्ह्यात वेरवली (ता. लांजा) येथे अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या सहयोगाने साहित्य संस्कृती जागर शिबिर आयोजित करण्यात आले आहे. १८ ते ३५ वयोगटातील तरुण-तरुणींसाठी हे शिबिर २२ मे ते २६ मे या काळात होणार आहे.

विश्व मराठी परिषदेतर्फे ऑनलाइन कीर्तन-प्रवचन अभ्यासवर्ग

पुणे : येथील विश्व मराठी परिषदेतर्फे आंतरराष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्तबुवा आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली चार महिन्यांचा ऑनलाइन कीर्तन प्रवचन अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला आहे. हा वर्ग येत्या २२ एप्रिलपासून सुरू होणार असून तो १८ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

विश्व मराठी परिषदेतर्फे लेखक-प्रकाशक कार्यशाळा

पुणे : विश्व मराठी परिषदेने जीवनाचे व्यवस्थापन या विषयावर येत्या मंगळवारपासून (दि. २८ मार्च) चार दिवसांची ऑनलाइन मोफत कार्यशाळा आयोजित केली आहे.