माहितीचा अधिकार कायदा ऑनलाइन कार्यशाळा

पुणे : येथील विश्व मराठी परिषदेने बनण्याकरिता माहितीचा अधिकार कायदा ऑनलाइन कार्यशाळा आयोजित केली आहे. सामान्य नागरिकांसाठी माहिती अधिकार कायद्याचे दिशादर्शक मार्गदर्शन या कार्यशाळेत होणार असून माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सजग नागरिक मंच अध्यक्ष विवेक वेलणकर मार्गदर्शन करणार आहेत.

संसद, प्रशासन, न्यायसंस्था आणि पत्रकारिता यांना लोकशाहीचे चार मुख्य स्तंभ मानले जाते. मात्र लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून चालवलेली व्यवस्था या लोकशाहीच्या व्याख्येतील सामान्य लोकांना लोकशाहीच्या स्तंभामध्ये कोणतेही स्थान नाही. त्यासाठी सजग नागरिक अर्थात जागरूक चौकीदारांची फार मोठी गरज आहे. अण्णा हजारे यांनी भीम प्रयत्न करून माहितीचा अधिकार कायदा देशामध्ये आणला आणि लोकपाल कायद्यासाठी त्यांचे अविरत प्रयत्न सुरू आहेत. समाजातूनही अनेक सजग नागरिक आणि माहितीचा अधिकार तज्ज्ञ निर्माण होणे अतिशय आवश्यक आहे. मात्र ते नि:स्पृह, प्रामाणिक आणि संवेदनाशील असले पाहिजेत. त्यादृष्टीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत माहिती अधिकार कायदा म्हणजे काय? पार्श्वभूमी आणि निर्मितीची कहाणी, माहिती अधिकार कायद्याची व्यवस्था, कार्यपद्धती आणि रचना, माहिती अधिकार कायद्याचा उपयोग कसा करायचा, माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून कसे काम करावे, त्यातील आव्हाने आणि संधी, कोणती काळजी घ्यावी, माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून भ्रष्टाचार, चुकीच्या गोष्टी उघड कशा होतात याचे अनुभव, वीज कायदा, वीज ग्राहकांचे हक्क, वीज तक्रार निवारण व्यवस्था, बॅंक ग्राहकांचे हक्क, बॅंक तक्रार निवारण व्यवस्था, स्वयंपाकाचा गॅस ग्राहकांचे हक्क, ग्राहक संरक्षण कायदा, सेवा हमी कायदा, दप्तर दिरंगाई कायदा, रुग्णांचे हक्क अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाईल.

कार्यशाळेचे मार्गदर्शक विवेक वेलणककर यांनी ‘ग्राहक राजा, सजग हो’ या पुस्तकाचे लेखन केले असून आजवर पन्नास हजारांहून अधिक नागरिक आणि शासकीय कर्मचारी यांना माहिती अधिकार कायद्याचे प्रशिक्षण दिले आहे.

ही ऑनलाइन कार्यशाळा ३ ते ६ मे या कालावधीत दररोज रात्री ८ ते ९ या वेळेत होईल. ऑनलाइन वर्ग झूमद्वारे होतील. कार्यशाळेचे सहभाग शुल्क ७५० रुपये असून विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात २० टक्के सवलत मिळेल. ऑनलाइन नोंदणीसाठी लिंक –

www.vishwamarathiparishad.org/karysh

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply