‘गणपत वाणी’ समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण

चिपळूण : येथील महाराष्ट्र साहित्य परिषद आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्येष्ठ नाटककार अप्पासाहेब जाधव स्मृती गणपत वाणी राज्यस्तरीय ‘समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धे’चे पारितोषिक वितरण शनिवारी (दि. २१) चिपळूणला होणार आहे.

सृष्टी वाचविण्याचा संदेश साहित्यिकांनी द्यावा : प्रा. सुहास बारटक्के

चिपळूण : धोक्यात आलेल्या सृष्टीला वाचवण्यासाठी काय करता येईल समाजाला सांगण्यासाठी साहित्यिकांनी शाश्वत निसर्ग जपण्याचा संदेश आपल्या साहित्यातून द्यायला हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक प्रा. सुहास बारटक्के यांनी केले.

चिपळूणजवळ धामणवणे येथे रविवारी बांधावरचे साहित्य संमेलन

चिपळूण : ‘माणूस, माती आणि नाती यांचे बंध उलगडणारा साहित्यिक सहवास’ असे बोधवाक्य घेऊन राज्यभरातील साहित्य रसिकांसमोर आलेले ‘बांधावरचे संमेलन’ येत्या रविवारी (दि. ८) चिपळूणनजीकच्या धामणवणे येथील विठ्ठलाई मंदिराजवळील ‘साद मयूराची’ शिवारात होत आहे.

`गणपत वाणी` समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेला जगभरातून प्रतिसाद

चिपळूण : महाराष्ट्र साहित्य परिषद आणि कोकण मराठी साहित्य परिषद आयोजित ज्येष्ठ नाटककार अप्पासाहेब जाधव स्मृती अभिनव गणपत वाणी राज्यस्तरीय समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेला जगभरातील ५३६ कवींनी प्रतिसाद दिला.

`गणपत वाणी` कविता राज्यस्तरीय समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धा

चिपळूण : बा. सी. मर्ढेकर यांच्या `गणपत वाणी` कवितेची गाजलेली ओळ सद्यःस्थितीतील अभिव्यक्तीत मांडायला सांगणारी अभिनव समस्यापूर्ती राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कोकणातील लोकगीते, लोककला स्पर्धा

चिपळूण : कोकणातील लुप्त होणाऱ्या कलांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेतर्फे लोकगीते आणि लोककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पहिल्या पाच आणि उत्तेजनार्थ दहा लोककलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे.