कोकणातील विजेच्या तारांना जालन्यातील खांबांचा आधार

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात तौते चक्रीवादळामुळे निर्माण झालेला वीजपुरवठा सुरळित करण्यासाठी राज्याच्या इतर भागातूनही साहित्य आणले जात आहे. आज जालना येथून खां आणि ट्रान्स्फार्मर रत्नागिरीत दाखल झाले आहेत. दरम्यान, महावितरणने सुरू केलेल्या युद्धपातळीवरील कामांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले.

Continue reading

रत्नागिरीत चक्रीवादळाने साडेतीन लाख ग्राहक अजूनही विजेविना; जिल्ह्यात किमान एक हजार घरांचे नुकसान

रत्नागिरी : अरबी समुद्रात रविवारी, १६ मे रोजी झालेल्या तौते चक्रीवादळाने रत्नागिरी जिल्ह्यात महावितरण कंपनीचे सर्वाधिक नुकसान झाले असून त्यामुळे सुमारे साडेतीन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा अजूनही खंडित आहे. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी कर्मचारी युद्धपातळीवर झटत आहेत.

Continue reading

वाढत्या थकबाकीमुळे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कारवाईची भीती

रत्नागिरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत महावितरण कंपनीच्या बिलांच्या वाढत्या थकबाकीमुळे कर्मचारी कारवाईच्या भीतीच्या छायेत वावरत आहेत. दोन्ही जिल्ह्यांतील एकूण एक लाख ८१ हजार ९९४ ग्राहकांकडे ८३ कोटी चार लाखाची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू असून होळी, रविवार किंवा सणाची कोणतीच सुट्टी न घेता येत्या ३१ मार्चपर्यंत सर्व वीजबिल भरणा केंद्रावर कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

Continue reading

भाजपतर्फे रत्नागिरीत वाढीव वीजबिलांविरोधात आंदोलन; राज्य सरकारचा धिक्कार

रत्नागिरी : लॉकडाउन काळातील वाढीव वीजबिले माफ करण्याच्या मागणीसाठी आज (२३ नोव्हेंबर) भारतीय जनता पक्षातर्फे रत्नागिरी शहरातील नाचणे रोड येथील महावितरण कार्यालयाबाहेर वीजबिले फाडून आंदोलन करण्यात आले.

Continue reading

वाढीव वीजबिलमाफीसाठी २३ नोव्हेंबरला रत्नागिरी जिल्ह्यात भाजपचे आंदोलन

रत्नागिरी : लॉकडाउनच्या काळात महावितरणकडून देण्यात आलेल्या अवास्तव वाढीव वीजबिलांविरोधात २३ नोव्हेंबर रोजी भाजपच्या दक्षिण रत्नागिरी विभागातर्फे चार तालुक्यांमध्ये आंदोलन करून निषेध नोंदवण्यात येणार आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला वीजबिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजव्यापी आंदोलन केले जाणार आहे. त्या आंदोलनाचाच हा एक भाग आहे.

Continue reading

टाटा पॉवर महाराष्ट्रात उभारणार १०० मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्रात १०० मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचा प्रकल्प महावितरण (एमएसईडीसीएल) कंपनीकडून टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड (टीपीआरईएल) या कंपनीला मिळाला आहे. या संदर्भात ‘एमएसईडीसीएल’कडून ‘टीपीआरईएल’ला पत्र पाठविण्यात आल्याचे टाटा पॉवर कंपनीकडून घोषित करण्यात आले आहे.

Continue reading

1 2