रत्नागिरी : केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयामार्फत पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी, चिपळूण आणि खेड या तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. या तालुक्यांमधल्या ज्या गृहनिर्माण सहकारी संस्थांकडे छतावर सौर ऊर्जानिर्मितीसाठी जागा उपलब्ध असेल, अशा गृहनिर्माण सहकारी संस्थांची प्राधान्याने निवड केली जाणार आहे. या योजनेच्या कार्यवाहीसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांची सभा १४ जुलै २०२५ (सोमवार) रोजी आयोजित करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा सहकारी हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, तसेच महावितरणचे अधिकारी या वेळी मार्गदर्शन करणार आहेत. १४ जुलैला सायंकाळी सहा वाजता ही सभा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जयस्तंभ (रत्नागिरी) येथील प्रधान कार्यालयाच्या सभागृहात होणार आहे. या सभेला रत्नागिरी तालुक्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून माहिती घ्यावी, असे आवाहन सहायक निबंधक (सहकारी संस्था) साहेबराव पाटील यांनी केले आहे.
(या संदर्भात अधिक माहिती देणारा, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांचा व्हिडिओ सोबत दिला आहे.)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

