आर्थिक, राजकीय, सहकार, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात नवनवीन शिखरे काबीज करणारे अॅड. दीपक पटवर्धन यांचा छप्पन्नावा वाढदिवस २७ मे रोजी आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
आर्थिक, राजकीय, सहकार, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात नवनवीन शिखरे काबीज करणारे अॅड. दीपक पटवर्धन यांचा छप्पन्नावा वाढदिवस २७ मे रोजी आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यकारी संचालकपदी अजय चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असून श्री. चव्हाण यांनी आज पदभार स्वीकारला.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांची, तर उपाध्यक्षपदी बाबाजी जाधव यांची आज (१ डिसेंबर) एकमताने निवड झाली.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सात जागांसाठी दोन दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीत पाच जागा सत्तारूढ सहकार पॅनेलला, तर दोन जागा विरोधी सदस्यांना मिळाल्या. संचालक मंडळाच्या २१ पैकी १९ जागा जिंकून सहकार पॅनेलने आपले वर्चस्व मात्र कायम राखले आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त, व्यापारी, दुकानदार, छोटेमोठे उद्योजक आणि वाहनधारकांना अल्प दरात कर्जपुरवठा करणार असल्याचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.मंत्री उदय सामंत यांनी जिल्हा बँक पाच टक्के दराने कर्जपुरवठा करणार असल्याचे काल जाहीर केले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांना अल्प दरात कर्ज मिळणार की, पाच टक्के दराने, याचा खुलासा होऊ शकला नाही.
सावंतवाडी : गेली दोन वर्षे करोनाच्या काळामुळे उद्योगधंद्यांची पार वाताहत लागली आहे. अशा स्थितीत उद्योगांना जगविण्यासाठी बँकेच्या व्याजाचे पॅकेज देऊन जगवावे, अशी मागणी महाराष्ट्र कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.