मतदारांची मनधरणी

लोकशाहीमध्ये व्यक्तीला स्वातंत्र्य असले तरी व्यक्तिमाहात्म्य श्रेष्ठ ठरत असते. एखाद्याच व्यक्तीला पुढे करून ती व्यक्ती म्हणजे पक्ष, ती व्यक्ती म्हणजे देश असे चित्र निर्माण केले जाते. मतदारांच्या मनात त्या व्यक्तीविषयी, त्या पक्षाविषयी विरोधातील मत असेल, तर पर्यायी योग्य दुसरा पक्ष किंवा दुसरा उमेदवार त्यांच्या नजरेसमोर नसतो. त्यामुळेच त्यांचा गोंधळ उडत असतो. या गोंधळात पडण्यापेक्षा मतदानाकडे पाठ फिरवलेली बरी, असे त्यांना वाटत असते. त्यात बदल व्हायला हवा असेल, तर मतदारांच्या प्रबोधनाबरोबरच त्यांना आश्वासक चित्र निर्माण झाले पाहिजे.

पाणीटंचाईची परंपरा

प्रत्येकाने आपल्या पाण्याची गरज भागवली तर नेते म्हणून त्यांची किंमत कमी होईल ही भीती त्यांना वाटते. म्हणूनच पाण्याच्या टंचाईची रत्नागिरी जिल्ह्याची परंपरा कायम राखण्याकडेच लोकप्रतिनिधी आणि शासनाचाही नेहमीच कल राहतो. नेमेचि येणाऱ्या पावसाळ्याप्रमाणे नेमेचि उन्हाळा येणार आणि पाणीटंचाई कायम राहणार आहे. पावसाचे पाणी साठविले पाहिजे, हे पालुपद मात्र न चुकता, न विसरता आळविले जाणार आहे. यावर्षीचा उन्हाळा तरी त्याला अपवाद कसा ठरेल?

ध्यास : गाव जगवण्याचा, जागवण्याचा

जुन्या आणि चांगल्या प्रथा-परंपरांचे जतन करणे, सध्याच्या काळात चांगले काम करणाऱ्यांना शाबासकी देणे आणि उद्याच्या पिढीसाठी उत्तम विचारांचे बीजारोपण करणे हे उद्दिष्ट राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने गेल्या आठ ग्रामीण साहित्य संमेलनांपासून ब्रीद म्हणूनच अंगीकारले आहे. त्याचे प्रत्यंतर नुकत्याच शिपोशीत झालेल्या नवव्या संमेलनातही आले.

नवव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

लांजा : शिपोशी (ता. लांजा) येथे भरलेल्या नवव्या ग्रामीण साहित्य संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या या संमेलनात झालेल्या विविधरंगी कार्यक्रमांना रसिकांनी चांगली दाद दिली.

नवव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनासाठी शिपोशी गाव सज्ज

लांजा : राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ (मुंबई) आणि शिपोशी ग्रुप ग्रामपंचायत (ता. लांजा) यांच्या संयुक्त विद्यमाने होणार असलेल्या नवव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाकरिता शिपोशी गाव सज्ज झाले आहे.

लक्ष्मीबाई क्रांतीज्योतीने ग्रामीण साहित्य संमेलनाचे बिगूल वाजले

लांजा : रणरागिणी राणी लक्ष्मीबाई क्रांतीज्योतीने शिपोशी (ता. लांजा) येथे येत्या मार्च महिन्यात होणाऱ्या नवव्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे संमेलनाचे बिगूल वाजले आहेत.