विश्व मराठी परिषदेतर्फे ऑनलाइन कीर्तन-प्रवचन अभ्यासवर्ग

पुणे : येथील विश्व मराठी परिषदेतर्फे आंतरराष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्तबुवा आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली चार महिन्यांचा ऑनलाइन कीर्तन प्रवचन अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला आहे. हा वर्ग येत्या २२ एप्रिलपासून सुरू होणार असून तो १८ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

विश्व मराठी परिषदेतर्फे लेखक-प्रकाशक कार्यशाळा

पुणे : विश्व मराठी परिषदेने जीवनाचे व्यवस्थापन या विषयावर येत्या मंगळवारपासून (दि. २८ मार्च) चार दिवसांची ऑनलाइन मोफत कार्यशाळा आयोजित केली आहे.

कोकणातील बागातदारांना यापुढे कृषी दराने वीज बिले

रत्नागिरी : कोकणातील आंबा, काजू, नारळ, चिकू बागायतदारांना आता कृषी दरानेच वीज बिले दिली जाणार आहेत. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे यासंदर्भात दिलेल्या प्रेझेंटेशनला यश आल्याची माहिती कोकण बिझिनेस फोरमचे संजय यादवराव यांनी दिली.

आचरे गावातली रामनवमी… ‘पुलं’, कुमार गंधर्वांच्या सहभागाने पुलकित झालेली..

आचरे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील श्री देव रामेश्वर मंदिरातील १९७५ सालचा रामनवमी उत्सव काही औरच होता. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे, सुनीताबाई, कुमार गंधर्व यांच्यासह महाराष्ट्रातील ख्यातकीर्त ७० कलावंतांच्या सहभागामुळे तो त्रिशतसांवत्सरिक उत्सव अविस्मरणीय झाला. त्या उत्सवाच्या आठवणींबद्दल आचऱ्यातील ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला हा लेख…

सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल जाहीर

तळेरे (ता. कणकवली) : येथील अक्षरोत्सव परिवार आणि श्रावणी कॉम्प्युटर एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हस्ताक्षर स्पर्धेत संचिता संभाजी पाटील, अनुश्री अभिजित राणे आणि अक्षता मारुती गुंजाळ यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

मराठी संगीत रंगभूमीचा पहाडी सूर – भार्गवराम आचरेकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाट्यवेड्या मालवण तालुक्याने तीन भार्गवराम मराठी रंगभूमीला दिले. भार्गवराम उर्फ मामा वरेरकर, भार्गवराम उर्फ मामा आचरेकर आणि भार्गवराम उर्फ दादा पांगे. २७ मार्च हा जागतिक रंगभूमी दिन. तसेच, भार्गवराम आचरेकर यांचा स्मृतिदिनही २७ मार्च. त्या निमित्ताने, मराठी संगीत रंगभूमीचा पहाडी सूर अशी ओळख असलेले भार्गवराम उर्फ मामा आचरेकर यांच्याबद्दल त्यांच्याच आचरा (मालवण) या गावातील ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला लेख येथे प्रसिद्ध करत आहोत.