आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात रंगणार अरुण इंगवलेंची मुलाखत

तळवडे (ता. राजापूर) : येथे राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाच्या आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात चिपळूण येथील नामवंत कवी, बोलीभाषांचे अभ्यासक आणि समीक्षक अरुण गजानन इंगवले यांची विशेष मुलाखत शनिवारी (दि. ११ फेब्रुवारी) दुपारनंतरच्या ‘साहित्यविचार’ सत्रात पत्रकार-लेखक धीरज वाटेकर इंगवले यांची मुलाखत घेणार आहेत.

ग्रामीण साहित्य संमेलनामुळे कोकणाचा जगात प्रचार : रवींद्र प्रभुदेसाई

तळवडे (ता. राजापूर) : ग्रामीण मराठी साहित्य संमेलनामुळे स्वर्गीय कोकणभूमीचा जगभरात प्रचार व्हायला मदत होईल, असा आशावाद पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी व्यक्त केला.

लांज्यात राणी लक्ष्मीबाई जयंती स्पर्धांमध्ये मुलींचे वर्चस्व

लांजा : राणी लक्ष्मीबाईंच्या जयंतीच्या निमित्ताने लांजा तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये मुलींनी वर्चस्व राखले. यावेळी देण्यात आलेल्या पारितोषिकांपैकी २१ पैकी १७ पारितोषिके मुलींनी मिळविली, तर मुलांना अवघ्या ४ पारितोषिकांवर समाधान मानावे लागले.

राणी लक्ष्मीबाईंचे चरित्र लहान मुलांपर्यंत पोहोचावे – अ‍ॅड. विलास पाटणे

रत्नागिरी : महापराक्रमी झाशीच्या राणीचे चरित्र सर्व लहान मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे. ही मुलेच हा इतिहास वाचून इतिहास घडवू शकतील, असा विश्वास येथील विधिज्ञ अॅड. विलास पाटणे यांनी आज येथे व्यक्त केला.

नाचणे येथे शनिवारी राणी लक्ष्मीबाई जयंती

रत्नागिरी : रत्नागिरीजवळच्या नाचणे येथील ओम साई मित्र मंडळ हॉलमध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई जयंती साजरी केली जाणार आहे.

मोडीदर्पण आणि कोकण मीडिया दिवाळी अंकांचे गुरुवारी मुंबईत प्रकाशन

मुंबई : येथील मोडीलिपी मित्रमंडळाचा मोडीदर्पण आणि रत्नागिरीतील कोकण मीडिया या दोन दिवाळी अंकाचे प्रकाशन मुंबईत गुरुवारी (दि. २० ऑक्टोबर) होणार आहे. या समारंभात ‘सुलेखन’कार अच्युत पालव यांना अक्षररत्न पुरस्कार देण्यात येणार आहे.