कोकणविकासासाठी आवश्यक कामे केंद्राच्या माध्यमातून करणार; विनोद तावडेंची ग्वाही

रत्नागिरी : कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेली कामे केंद्र सरकारच्या पातळीवरून केली जातील, अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडे यांनी सात डिसेंबर रोजी रत्नागिरीत दिली.

सुरेश प्रभूप्रणित जनशिक्षण संस्थान लवकरच रत्नागिरी जिल्ह्यात

सिंधुदुर्गातील जनशिक्षण संस्थान आणि पुणे विमान प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील एक हजार महिलांना शिलाई मशीन आणि सायकल बँकअंतर्गत शंभर शाळांमधील एक हजार मुलींना सायकलचे वितरण या वेळी करण्यात आले.

भाजपतर्फे रत्नागिरीत वाढीव वीजबिलांविरोधात आंदोलन; राज्य सरकारचा धिक्कार

रत्नागिरी : लॉकडाउन काळातील वाढीव वीजबिले माफ करण्याच्या मागणीसाठी आज (२३ नोव्हेंबर) भारतीय जनता पक्षातर्फे रत्नागिरी शहरातील नाचणे रोड येथील महावितरण कार्यालयाबाहेर वीजबिले फाडून आंदोलन करण्यात आले.

कोकण मीडियाचा पाचवा दिवाळी अंक प्रकाशित; करोना कथा स्पर्धेचा निकाल जाहीर

रत्नागिरी : रत्नागिरीतून प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक कोकण मीडियाच्या पाचव्या दिवाळी अंकाचे आणि ई-बुकचे प्रकाशन आज (१३ नोव्हेंबर २०२०) रत्नागिरीत झाले. करोनाविषयक कथा स्पर्धाही कोकण मीडियाने या दिवाळी अंकाच्या निमित्ताने जाहीर करण्यात आली होती. त्या स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यात आला.

रत्नागिरी नगर वाचनालयातर्फे वाचकांसाठी कथा ऐकण्याची मोफत सुविधा

रत्नागिरी : रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय सातत्याने नवनवीन उपक्रम वाचक सभासदांसाठी आयोजित करत असते. करोनामुळे बंद असलेली वाचनालये नुकतीच पुन्हा सुरू झाली असून वाचकांसाठी वाचनालयाने कथा ऐकण्याची मोफत सुविधा देणारे अॅप मोफत उपलब्ध करून दिले आहे.

रत्नागिरीतील लॉकडाउन शिथिल होणार?; भाजप शिष्टमंडळाला जिल्हाधिकाऱ्यांचे आश्‍वासन

रत्नागिरी : देशात व राज्यात अनलॉक अर्थात लॉकडाउन शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू असताना रत्नागिरी जिल्ह्यात सलग दुसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर झाल्याने