रत्नागिरी : येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या वर्षपूर्तीनिमित्ताने येत्या २६ ते , २९ ऑगस्ट २०२१ या कालावधीत डायबेटीस असणाऱ्या व्यक्तीच्या पडद्याच्या तपासणीसाठी महाशिबिराचे आयोजन केले आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या वर्षपूर्तीनिमित्ताने येत्या २६ ते , २९ ऑगस्ट २०२१ या कालावधीत डायबेटीस असणाऱ्या व्यक्तीच्या पडद्याच्या तपासणीसाठी महाशिबिराचे आयोजन केले आहे.
गेल्या दीड वर्षापासून तरुणवर्ग, कॉर्पोरेट सेक्टर, शिक्षक, विद्यार्थी आणि एकूणच समाजाच्या सर्व स्तरांमध्ये आणि सर्व वयोगटामध्ये मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटर्स, टॅबलेट, टीव्ही यांचा वापर भरपूर प्रमाणात वाढला आहे. इतकेच नव्हे तर ३-४ वर्षांची लहान मुले पण आई-वडिलांकडून हट्टाने मोबाइल घेऊन गेम किंवा कार्टून्स बघताना दिसत आहेत. त्यामुळे कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम अनेकांना जाणवत आहे.
रत्नागिरी : सध्याच्या करोनाच्या काळात ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे आजार आहे, त्यांनी ते योग्य नियंत्रणात राहतील याची संपूर्ण काळजी घ्यायची आहे. असे आजार असलेल्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यासाठी येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलतर्फे येत्या २५ ते २७ जून या काळात विशेष तपासणी शिबिर होणार आहे.
रत्नागिरी : इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमुळे डोळ्यांच्या उपचारांसंदर्भातील कोकणातील उणीव दूर झाली आहे. आता यापुढे जाऊन इन्फिगोने पुढाकार घेऊन इतर वैद्यकीय विशेषज्ञांच्या समन्वयातून सर्वसामान्यांसाठी एकत्रितरीत्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.
इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या साखळीतील पंधराव्या हॉस्पिटलचं उद्घाटन रत्नागिरीत तीन महिन्यांपूर्वी झालं. मुंबईतल्या नेत्र रुग्णालयाच्या साखळीतलं एक हॉस्पिटल रत्नागिरीत सुरू झालं असलं तरी ते मूळच्या कोकणवासीयाने सुरू केलं आहे, हे त्याचं विशेष. हे वैशिष्ट्य जपणाऱ्या, रुग्णांना दृष्टी देणाऱ्या आणि औपचारिक तसंच अनौपचारिक संवादाद्वारे समाजालाही दृष्टिकोन देणारे इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या साखळीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांचा १९ नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांचं अभीष्टचिंतन!
रत्नागिरी : इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील डोळ्यांच्या उपचाराविषयींची कमतरता दूर झाली आहे, असे मत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी व्यक्त केले.