रत्नागिरी : येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या वर्षपूर्तीनिमित्ताने येत्या २६ ते , २९ ऑगस्ट २०२१ या कालावधीत डायबेटीस असणाऱ्या व्यक्तीच्या पडद्याच्या तपासणीसाठी महाशिबिराचे आयोजन केले आहे.
शिबिरात सुप्रसिद्ध रेटिना तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद कामत रुग्णांची तपासणी, उपचार आणि शस्त्रक्रिया करणार आहेत. यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून ९३७२७६६५०४ या क्रमांकावर फोन करून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या एक वर्षाच्या कालावधीत इन्फिगोच्या रेटिना सुपरस्पेशालिस्ट विभागात ३००० पेक्षा अधिक व्यक्तींवर पडद्याच्या आजारांवर उपचार करण्यात आले आहेत. या काळात २०० पेक्षा अधिक डोळ्यांच्या पडद्याच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया डॉ. कामत यांनी यशस्वीरीत्या आणि कौशल्याने पार पाडल्या आहेत. इन्फिगोचा रेटिना विभाग अत्यंत अत्याधुनिक निदानयंत्रणांनी सुसज्ज असून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकमेव आहे. त्यामध्ये थ्री डायमेन्शन सिटीस्कॅन, ग्रीनलेझर, बी स्कॅन, फिल्ड एनालायजरसारखे अत्याधुनिक जर्मन आणि अमेरिकन तंत्रज्ञान उपलब्ध असून अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही केल्या जातात. भारत ही मधुमेहाची राजधानी असून १५ टक्के व्यक्तींना मधुमेह असल्याचे आढळले आहे. त्यापैकी निम्म्या लोकांना मधुमेहामुळे डोळ्यांच्या पडद्याचे गंभीर आजार होण्याचा आणि पुढे दृष्टी नष्ट होण्याचा तीव्र धोका असतो. यासाठी प्रत्येक मधुमेही व्यक्तीने आपल्या डोळ्यांची वर्षातून किमान दोनदा रेटिना स्पेशालिस्ट नेत्र तज्ज्ञांकडून तपासणी करणे आवश्यक असते.
रत्नागिरी जिल्ह्यात रेटिना तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने इन्फिगोने ही सुविधा उपलब्ध करून दिली असून या महाशिबिराचा प्रत्येक मधुमेही व्यक्तींने लाभ घ्यावा आणि आपली दृष्टी वाचवावी, असे आवाहन इन्फिगोचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर श्रीधर ठाकूर यांनी केले आहे.


