रत्नागिरीत आज १०९ नवे रुग्ण, ३६४ जण करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२४ ऑगस्ट) ३६४ रुग्ण करोनामुक्त झाले, तर १०४ नवे रुग्ण आढळले.

रत्नागिरी जिल्ह्यातील करोनामुक्तांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७१ हजार ७४१ झाली असून ही टक्केवारी ९५.४८ आहे. जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या १०४ करोनाबाधितांचा तपशील असा –

आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या १५२७ नमुन्यांपैकी १४८१ अहवाल निगेटिव्ह, तर ४६ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या १३६९ पैकी १३११ अहवाल निगेटिव्ह, तर ५८ पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७५ हजार १४३ झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील सहा लाख ३६ हजार ३८२ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज १०६० सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ७७८, तर लक्षणे असलेले २८२ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ५५० आहे. संस्थात्मक विलगीकरणात ४९५ रुग्ण असून ७९ जणांची नोंद अजून पोर्टलवर झालेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले २१३, डीसीएचसीमधील १२१, तर डीसीएचमध्ये १६१ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १२३ जण ऑक्सिजनवर, ६६ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आधीच्या दोन आणि आजच्या तीन अशा एकूण पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ३.६६ टक्के होता. या आठवड्यात तो ३.०१ टक्के झाला आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.४७ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २२६३ झाली आहे. त्यापैकी ५० वर्षे आणि त्यावरील वयाच्या मृतांची संख्या १८९७ (८३.८३ टक्के), तर मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी सहव्याधी (कोमॉर्बिड) असलेल्या रुग्णांची संख्या ८०६ (३५.६२ टक्के) आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३४, दापोली १९६, खेड १९९, गुहागर १६०, चिपळूण ४४३, संगमेश्वर १९९, रत्नागिरी ७६५, लांजा ११९, राजापूर १४८. (एकूण २२६३).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply