सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवबाधितांपेक्षा तिपटीहून अधिक करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२४ ऑगस्ट) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार नवबाधितांपेक्षा तिपटीहून अधिक करोनाबाधित बरे होऊन घरी गेले.

आज लागोपाठ दुसऱ्या दिवशी नवे ४७ करोनाबाधित रुग्ण आढळले, तर १५९ रुग्ण करोनामुक्त झाले.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५० हजार ४८९ झाली आहे. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १, दोडामार्ग ३, कणकवली १९, कुडाळ ८, मालवण २, सावंतवाडी १३, वैभववाडी ०, वेंगुर्ले १.

सक्रिय रुग्णांपैकी ७५ रुग्ण ऑक्सिजनवर तर १९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड १९०, दोडामार्ग ४५, कणकवली ३१५, कुडाळ ३८४, मालवण २३२, सावंतवाडी २०७, वैभववाडी ६९, वेंगुर्ले १०४, जिल्ह्याबाहेरील १५.

आज जिल्ह्यात एकाही करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही, मात्र याआधी मरण पावलेल्या ४ रुग्णांची नोंद आज झाली. त्यांचा तपशील असा – देवगड १ आणि कुडाळ ३. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार ३३२ झाली आहे.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १६७, दोडामार्ग – ३६, कणकवली – २७५, कुडाळ – २१३, मालवण – २६६, सावंतवाडी – १८३, वैभववाडी – ८०, वेंगुर्ले – १०३, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply