गोविंदराव पटवर्धन यांना ऑर्गन वाजवून श्रद्धांजली

ज्येष्ठ हार्मोनियम आणि ऑर्गनवादक पंडित गोविंदराव पटवर्धन यांचा सत्ताविसावा स्मृतिदिन ३० जानेवारी २०२३ रोजी झाला. रत्नागिरीत सुरू असलेल्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेच्या वेळी त्यांना श्रीरंग हेरंब जोगळेकर या रत्नागिरीतील उदयोन्मुख कलाकाराने ऑर्गन वाजवून श्रद्धांजली वाहिली. विशेष म्हणजे स्पर्धेचे परीक्षक धनंजय पुराणिक (डोंबिवली) यांनी त्याला तबल्याची साथ केली.

संगीत रणदुंदुभि – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत ६ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत रणदुंदुभि हे नाटक गोव्यातील मोरजी येथील संस्थेने सादर केले.

संगीत एकच प्याला – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत आज, ९ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत एकच प्याला हे नाटक गोव्याची नाट्यसंपदा संस्था सादर करणार आहे.

संगीत मंदारमाला – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत ३ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत मंदारमाला हे नाटक गुहागरची परस्पर सहायक संस्थेने सादर केले.

संगीत हे बंध रेशमाचे – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत आज ४ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत हे बंध रेशमाचे हे नाटक गोव्याची संस्था सादर करणार आहे.

संगीत तुका म्हणे आता – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत २ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत तुका म्हणे आता हे नाटक गोव्यातील समर्थ थिएटर्स संस्थेने सादर केले.