अंतिम फेरी – रत्नागिरी केंद्र
नाटक दि. ३ फेब्रुवारी २०२३, सायंकाळी ७.०० वाजता
रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत ३ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत मंदारमाला हे नाटक गुहागरच्या परस्पर सहायक मंडळ संस्थेने सादर केले.
सादर करणारी संस्था :
परस्पर सहाय्यक मंडळ (वाघांबे) मुंबई (नावात मुंबईचा उल्लेख असला, तरीही संस्था रत्नागिरी जिल्ह्यातील आहे.)(संस्थेचा पत्ता : मु. पो. वाघांबे, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी पिन – ४१५७२८)
परस्पर सहायक मंडळ (वाघांबे) मुंबई ही संस्था १९९० साली स्थापन झाली. सामाजिक, सांस्कृतिक तसेच शैक्षणिक क्षेत्राशी बांधिलकी स्वीकारून विविध उपक्रम राबविण्याच्या हेतूने संस्थेची स्थापना झाली.
पारंपरिक उत्सवांची परंपरा संस्थेच्या स्थापनेच्या पूर्वीपासून आजपर्यंत अखंड सुरू आहे. उत्सवात नाटकाचे सादरीकरण असायचेच. हाच धागा पकडून गेल्या १८ वर्षांपासून संस्था महाराष्ट्र राज्य होशी संगीत नाट्य स्पर्धेत सहभाग घेत आहे. संस्थेला सादरीकरण करताना सांघिक तसेच वैयक्तिक पारितोषिकेही मिळाली आहेत. अभिमानाची बाब म्हणजे गेल्या वर्षी सादर केलेल्या नाट्यसंहितेला ७ वैयक्तिक पारितोषिकांसह सांघिक पारितोषिक मिळाले आहे.
ग्रामीण भाग, अनेक सुविधाची प्रतिकूलता यांवर मात करत अनेक हौशी कलाकारांना कला सादरीकरणाची संधी संस्था देत असते. व्यावसायिकता हा हेतू न बाळगता निखळ आनंद प्राप्त करून देणे या भूमिकेतून ग्रामीण भागातील अनेक उत्सवांना नाटके सादर करण्यात संस्था धन्यता मानते. आजपर्यंत ५० हून अधिक नाट्यपुष्पे संस्थेने रंगदेवता नटेश्वराच्या चरणी अर्पण केली आहेत.
नाटक – संगीत मंदारमाला
श्रेयनामावली
लेखक : कै. विद्याधर गोखले,
मूळ संगीत : संगीतभूषण पं. राम मराठे
दिग्दर्शक : घनश्याम जोशी
संगीत दिग्दर्शक : घनश्याम जोशी
संगीत सहाय्यक : विलास हर्षे
नृत्य मार्गदर्शक : सौ. रूपाली लिमये
ध्वनी : एस कुमार साऊंड, रत्नागिरी
प्रकाशयोजना : अमेय धोपटकर
नेपथ्य : सौ. पायल लोगडे
रंगभूषा : प्रसाद लोगडे
वेशभूषा : परस्पर सहायक मंडळ, वाघांबे
पार्श्वसंगीत : प्रसाद पेठे, सौरभ हर्षे
ऑर्गन : हर्षल काटदरे
तबला : प्रथमेश शहाणे
भूमिका आणि कलावंत
मंदार : विशारद गुरव
मकरंद : गुरुप्रसाद आचार्य
मदनगोपाल : विपुल निमकर
भैरव : वीरेंद्र जोशी
रत्नमाला : देवश्री शहाणे
चंद्रकला : चैत्राली लिमये
मल्हार : राहुल ओक
महाराज : डॉ. कैलास वैद्य
पंचप्रमुख : विवेक निमकर
प्रधानजी : ऋषिकेश जोशी
तबलजी : अमेय भडसावळे
तानपुरा : ओमकार मोघे
सेवक : सुयोग गुरव, प्रणव गुरव
राजे: १ – प्रशांत आचार्य, २- अनिकेत भोळे, ३- तन्मय जोशी
मंदारमाला नाटकातील काही क्षणचित्रे












