अंतिम फेरी – रत्नागिरी केंद्र
नाटक दि. ९ फेब्रुवारी २०२३, सायंकाळी ७.०० वाजता
रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत आज, ९ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत एकच प्याला हे नाटक गोव्याची नाट्यसंपदा संस्था सादर करणार आहे.
यापूर्वी हे नाटक ५ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे जाहीर झाले होते. मात्र त्यात बदल झाला असून ते नाटक आज साद होणार आहे.
सादर करणारी संस्था :
नाट्यसंपदा, गोवा
एकच प्याला हे राम गणेश गडकरी यांनी लिहिलेले नाटक आहे. मद्यपान आणि त्याचे दुष्परिणाम हा विषय असलेले हे नाटक गडकऱ्यांनी १९१७ साली लिहिले. मात्र ते नाटक गंधर्व नाटक मंडळीच्या रंगभूमीवर गडकऱ्यांच्या मृत्यूनंतर दहा-अकरा महिन्यांनी आले. त्यात वि. सी. गुर्जरांनी नंतर पदे लिहिली. दारूच्या व्यसनामुळे सुधाकरसारखा एक बुद्धिमान, तेजस्वी आणि स्वाभिमानी माणूस स्वतःचा, आपल्या साध्वी पत्नीचा आणि आपल्या संसाराचा कसा नाश करून घेतो, ही भयानक गोष्ट गडकऱ्यांनी प्रभावी भाषेतून रोमांचकारी घटनांमधून परिणामकारक रीतीने सांगितलेली आहे. मद्यपानाच्या व्यसनाची अत्यंत मूलभूत आणि शास्त्रीय मीमांसा गडकऱ्यांनी लालित्यपूर्ण आणि नाटय़पूर्ण भाषेत या नाटकात केली आहे.
लेखक : राम गणेश गडकरी
दिग्दर्शक : चंद्रशेखर गवस
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

