सात जूनला रत्नागिरीत टेस्टिंग लॅब सुरू होणार; रत्नागिरीत आज करोनाचे नवे बारा रुग्ण

रत्नागिरीत आज करोनाचे नवे १२ पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातल्या करोनाबाधितांची एकूण संख्या ३१९ झाली आहे. रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात विषाणू प्रयोगशाळा सुरू होणार आहे. तिचे उद्घाटन येत्या रविवारी (ता. ७ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

करोना रुग्णसंख्येत दिवसभरात रत्नागिरीत २०, तर सिंधुदुर्गात १३ने वाढ

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दोन जून) सकाळी आणि सायंकाळी मिरज येथील प्रयोगशाळेकडून आलेल्या करोनाविषयक अहवालांनुसार जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या २०ने वाढली आहे. सकाळच्या अहवालात १०, तर सायंकाळच्या अहवालात १० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. एकूण बाधितांची संख्या ३०७ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (दोन जून) दिवसभरात करोना रुग्णांच्या संख्येत १३ने वाढ झाली. त्यामुळे तेथील बाधितांची एकूण संख्या ८५ झाली आहे.

करोना रुग्णांमध्ये रत्नागिरीत १८ने, तर सिंधुदुर्गात १६ने वाढ

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (एक जून) सकाळी मिळालेल्या अहवालांनुसार करोनाबाधितांची संख्या १८ने वाढली. तसेच, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या संख्येत आज (एक जून) १६ने वाढ झाली. त्यामुळे रत्नागिरीतील करोना रुग्णांची एकूण संख्या २८७, तर सिंधुदुर्गातील रुग्णांची संख्या ७२वर पोहोचली आहे.

रत्नागिरीतील करोना रुग्णसंख्या २६९; सिंधुदुर्गातील संख्या ५६वर

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या आज (३१ मे) २६९वर पोहोचली असून, करोनामुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या नऊवर पोहोचली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आज तीन नवे रुग्ण सापडल्याने तेथील रुग्णांची एकूण संख्या ५६ झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा ५३वर

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या संख्येत आणखी १४ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या ५३ झाली

रत्नागिरीत एका दिवसात रत्नागिरीत वाढले करोनाचे ४७ रुग्ण

रत्नागिरी : काल (२९ मे) रात्रीपासून आज (३० मे) सायंकाळपर्यंत मिरज येथील विषाणू प्रयोगशाळेकडून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला मिळालेल्या अहवालांनुसार, जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या संख्येत ४७ने वाढ झाली आहे. काल (२९ मे) रात्री २५ रुग्ण आढळले होते. आज सायंकाळी आणखी २२ रुग्णांची त्यात भर पडली आहे. आज एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे.