रत्नागिरी जिल्ह्यात आणखी सात कोरोनाबाधितांची भर; संख्या १३२

रत्नागिरी : आज (२२ मे) रोजी मिरज येथून आलेल्या तपासणी अहवालांपैकी सात अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर ४५५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या १३२ झाली आहे. त्यापैकी ९१ रुग्णांवर उपचार सुरू असून, ३७ जणांना बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे ११ नवे रुग्ण आणि करोनाचा चौथा बळी; रुग्णसंख्या १२४वर

रत्नागिरी : २१ मे रोजी रात्री उशिरा आलेल्या अहवालांतील ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी नऊ जण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल आहेत; मात्र दोन रुग्ण तपासणी करून आपापल्या घरी गेले असल्याची धक्कादायक माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी रात्री उशिरा दिली. त्यांना लवकरात लवकर शोधण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

‘शिवसेनेला भरभरून देणाऱ्या कोकणाकडे सरकारचे दुर्लक्ष’

रत्नागिरी :  ‘गेल्या दोन महिन्यांत कोकणात करोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना स्वॅबच्या तपासणीसाठी मिरज येथील प्रयोगशाळेवर अवलंबून राहावे लागत आहे. शिवसेनेला

रत्नागिरीत नवे १६ करोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्येचे शतक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस सातत्याने वाढत असलेल्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काल (१९ मे) १६ जणांना पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले होते; मात्र आज (२० मे) पुन्हा नवे १६ रुग्ण करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या १०८ झाली आहे.

रत्नागिरीतील आणखी १६ रुग्णांना करोनामुक्त झाल्याने घरी सोडले!

रत्नागिरी : गेले काही दिवस सातत्याने रत्नागिरी जिल्ह्यातील करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज (१९ मे) एक दिलासादायक

रत्नागिरीतील करोना रुग्णसंख्या ८२; आज सापडले नवे पाच रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरीतील करोना रुग्णांची संख्या वाढतच असून, आज (१५ मे) पाच नव्या रुग्णांची भर त्यात पडली आहे. कालही (१४ मे) तीन रुग्ण सापडले होते. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता ८२ वर पोहोचली आहे. त्यापैकी पाच रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत जिल्ह्यात तीन जणांचा बळी करोनाने घेतला आहे.