रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने सायकल रॅली काढून केले सावरकरांना अभिवादन

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी (२६ फेब्रुवारी) रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे लक्ष्मी चौक येथील वीर सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिरगाव गायवाडी येथे वीर सावरकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि दामले कुटुंबाने १०० वर्षे जतन करून ठेवलेल्या खोलीला भेट देण्यात आली. या दोन्ही उपक्रमांमध्ये क्लबमधील सायकलस्वार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बुधवारी ‘सागरा प्राण तळमळला’, गुरुवारी कवी कुसमाग्रज जयंती

रत्नागिरी : महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद, मराठी भाषा समिती आणि रत्नागिरी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत दोन दिवसांचा कार्यक्रम रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे.

पुस्तकांचे गाव – मालगुंड प्रकल्पाचे रविवारी उद्घाटन

रत्नागिरी : मालगुंड हे पुस्तकाचे गाव – आणि कोकण साहित्य सन्मान दालनाचे येत्या रविवारी (दि. २० एप्रिल) मालगुंड येथे उद्घाटन होणार आहे.

कोकण मराठी साहित्य परिषदेचे वाङ्मयीन पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेचे २०२२-२३ सालचे वाङ्मयीन आणि वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यांचे वितरण १७ नोव्हेंबर रोजी मालगुंड येथे होणारआहे.

कोकण मराठी साहित्य परिषदेचे शनिवारपासून जिल्हा साहित्य संमेलन

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा मराठी साहित्य संमेलन ६ आणि ७ एप्रिलला मालगुंडच्या कवी केशवसुत स्मारकात आयोजित करण्यात आले आहे.

छोट्या शहरांमध्ये साहित्य संमेलनांची गरज – विनोद शिरसाठ

राजापूर : समाजाची जडण-घडण आणि प्रबोधनासाठी तालुका स्तर, ग्रामीण भागामध्ये अशा संमेलनाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन साप्ताहिक साधनाचे संपादक विनोद शिरसाट यांनी व्यक्त केले.