अनलॉक ४ : केंद्र सरकारच्या नव्या सूचना जारी

लॉकडाउन टप्प्याटप्प्याने उघडण्याच्या प्रक्रियेतील पुढचा टप्पा म्हणजेच ‘अनलॉक ४’च्या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने आज (२९ ऑगस्ट) रात्री जाहीर केल्या. त्यानुसार, कंटेन्मेंट झोनच्या बाहेर पूर्वीपेक्षा अधिक कामकाज सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे; मात्र कंटेन्मेंट झोनमधील कडक निर्बंध सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत सुरूच राहतील, असेही त्यात म्हटले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ७५ नवे करोनाबाधित रुग्ण; एकूण संख्या ३७१६

रत्नागिरी : आज (ता. २८) रत्नागिरी जिल्ह्यात ७५ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या आता ३७१६ झाली आहे. सिंधुदुर्गातील रुग्णांची एकूण संख्या १०९६ झाली आहे.

परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मानावा लागेल : उदय सामंत

मुंबई : आरोप -प्रत्यारोप करण्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून त्यातून मार्ग काढावा लागेल आणि त्या निर्णयाचा आदर सर्वांनाच करावा

रत्नागिरी जिल्ह्यात ६६ नवे करोनाबाधित, तिघांचा मृत्यू

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. २७) नव्या ६६ करोनाबाधितांची नोंद झाली, तर तिघांचा मृत्यू झाला. सिंधुदुर्गात आज १८ नवे रुग्ण आढळले.

देवरुख-संगमेश्वरात २५ हजार गणेशमूर्तींचे शांततेत विसर्जन; गौरींनाही निरोप

देवरुख : करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव भाविकांनी अत्यंत साधेपणाने आणि नियम व अटींचे पालन करून साजरा केला. देवरुखात आज (२७ ऑगस्ट) पाच दिवसांच्या गणपतींना, तसेच गौरींनाही शांततेत निरोप देण्यात आला. देवरुख परिसरात १२ हजार व संगमेश्वर परिसरात १३ हजार घरगुती गणेशमूर्तींचे आज विसर्जन झाले.

कोकणातील मच्छीमारांसाठी ६५.१७ कोटींचे पॅकेज : उदय सामंत

रत्नागिरी : कोकणातील ५४ हजार ५७३ सागरी मच्छीमारांसाठी राज्य शासनाने ६५ कोटी १७ लाख रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. क्यार, महा चक्रीवादळांमध्ये झालेले नुकसान, तसेच करोनामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर हे पॅकेज जाहीर करण्यात आल्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे प्रभारी पालकमंत्री उदय सामंत यांनी आज (२६ ऑगस्ट) ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.