रत्नागिरी : आज (ता. २८) रत्नागिरी जिल्ह्यात ७५ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या आता ३७१६ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात तपासलेल्या २६ हजार ६८६ नमुन्यांपैकी २२ हजार ९५८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. रत्नागिरीच्या प्रयोगशाळेत आता एकही नमुना तपासणीसाठी प्रलंबित नाही. सिंधुदुर्गातील रुग्णांची एकूण संख्या १०९६ झाली आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
आज आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – रत्नागिरी २०, लांजा ८, राजापूर २, कळंबणी ७, कामथे १०, दापोली ४, गुहागर १. ॲन्टीजेन टेस्ट – रत्नागिरी १३, खासगी हॉस्पिटल १०.
आज बरे झालेल्या ५४ जणांना घरी पाठविण्यात आले. त्यांचा तपशील असा – जिल्हा रुग्णालय ९, कामथे ३, आयटीआय रत्नागिरी २१, पोलीस हेडक्वार्टर्स, रत्नागिरी २१. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या २३७८ झाली आहे.
आज दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यातील एक चिपळूण तालुक्यातील ५५ वर्षांचा रुग्ण, तर एक पावस (ता. रत्नागिरी) येथील ५१ वर्षीय रुग्ण आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या एकूण मृतांची संख्या १२९ झाली आहे. रत्नागिरी तालुक्यातील मृतांची संख्या वाढली असून, ती ४३ झाली आहे.
सध्या विविध रुग्णालयांमध्ये १२०९ जण उपचार घेत आहेत. संस्थात्मक विलगीकरणासठी १०७ जणांना ठेवण्यात आले असून, गृह विलगीकरणात असलेल्यांची संख्या ७६६२ आहे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
आज मिळालेल्या नऊ नव्या रुग्णांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १०९६ झाली आहे. ५९५ जण बरे झाले असून, १९ जणांचा मृत्यू झाला आहे. ४८२ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. १६ ऑगस्टपासून जिल्ह्यात रेल्वेने २१७२ जण आले आहेत. एकूण १२ हजार २२ व्यक्ती विलगीकरणात आहेत. सध्या जिल्ह्यात १७६ कंटेन्मेंट झोन आहेत.
