मोडीदर्पण आणि कोकण मीडिया दिवाळी अंकांचे गुरुवारी मुंबईत प्रकाशन

मुंबई : येथील मोडीलिपी मित्रमंडळाचा मोडीदर्पण आणि रत्नागिरीतील कोकण मीडिया या दोन दिवाळी अंकाचे प्रकाशन मुंबईत गुरुवारी (दि. २० ऑक्टोबर) होणार आहे. या समारंभात ‘सुलेखन’कार अच्युत पालव यांना अक्षररत्न पुरस्कार देण्यात येणार आहे.

कोकणातील उत्सव – कोकण मीडियाच्या लेख व चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

वेगवेगळ्या दैवतांचे वैभवशाली पारंपरिक उत्सव हे कोकणाचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. साप्ताहिक कोकण मीडियाचा २०२२चा दिवाळी विशेषांक याच वैशिष्ट्याला वाहिलेला आहे. त्यासाठी ‘कोकणातील उत्सव’ या विषयावर लेख आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद आचरे उर्दू शाळेची आदर्श कथामाला शाळा म्हणून निवड

आचरे : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातल्या आचरे येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेची सिंधुदुर्गातील एकमेव अल्पसंख्याक विभागातील आदर्श कथामाला शाळा म्हणून निवड झाली आहे.

एक तरी पुस्तक लिहावे

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या निष्क्रियतेबाबत यापूर्वी या सदरात यापूर्वी अनेक वेळा मुद्दे मांडले होते. यावेळी मात्र एक सकारात्मक मुद्दा मांडण्याची संधी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी तालुका शाखेने दिली आहे. गेली काही वर्षे सूप्तावस्थेत असलेल्या या शाखेचे अलीकडेच पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. शाखेतर्फे विविध संकल्प जाहीर करण्यात आले आहेत. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरापर्यंत पोहोचण्याचा संकल्प त्यामध्ये आहे.

कवितेमध्ये आशय आणि अभिव्यक्तीला महत्त्व : जयश्री बर्वे

रत्नागिरी : कवितेमध्ये आशयाइतकेच आणि अभिव्यक्तीला महत्त्व असते. ते दोन्ही परस्परपूरक आहेत. आशयाबरोबरच भाषा, शब्द आणि कल्पनासौंदर्य महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन निवृत्त प्राध्यापिका सौ. जयश्री बर्वे यांनी आज येथे केले.

कोकण मीडियाचा २०२२चा दिवाळी अंक कोकणातल्या उत्सवांवर…; लेख आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन

वेगवेगळ्या दैवतांचे वैभवशाली पारंपरिक उत्सव हे कोकणाचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. साप्ताहिक कोकण मीडियाचा २०२२चा दिवाळी विशेषांक याच वैशिष्ट्याला वाहिलेला आहे. ‘कोकणातले उत्सव’ या विषयावर लेख आणि चित्रं मागवण्यात येत असून, सर्वोत्कृष्ट लेख आणि चित्रांना रोख पारितोषिकं दिली जाणार आहेत. सविस्तर वाचा पुढे…