मुख्यमंत्र्यांनी कोकणवासीयांना वाऱ्यावर सोडलं नाही, वादळात लोटलं!

मुख्यमंत्री हवेतून आले, काही मिनिटं जिल्हाधिकारी कार्यालयात बसले. पत्रकार परिषदेला उभे राहिले आणि निघून गेले. तौते चक्रीवादळानं झालेल्या नुकसानीचा आढावा त्यांनी आपल्या धावत्या दौऱ्यात घेतला. आपण कोकणवासीयांना वाऱ्यावर सोडणार नाही, असं त्यांनी सांगितलं, पण असंख्य प्रश्नांच्या चक्रीवादळात कोकणवासीयांना लोटून देऊन ते पुढे निघून गेले.

कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील कालावधी दुपटीने वाढवून १२ ते १६ आठवड्यांवर

नवी दिल्ली : कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवड्यांचे असावे, अशी शिफारस डॉ. एन. के. अरोरा यांच्या अध्यक्षतेखालील कोविड वर्किंग ग्रुपने केंद्र सरकारला केली आहे. सध्या कोविशिल्ड लशीचे दोन डोस सहा ते आठ आठवड्यांच्या अंतराने दिले जात आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने ही शिफारस स्वीकारली असून, त्यानुसार आता अंमलबजावणी केली जाणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आज ७७९० जणांना करोनाप्रतिबंधक डोस

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज, गुरुवार, १३ मे रोजी ग्रामीण आणि शहरी भागातील केंद्रांवर करोनाप्रतिबंधक लसीकरण होणार आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सहा हजार ३९० तर शहरी भागातील १४ केंद्रांमध्ये १४०० अशा एकूण ७ ७९० लोकांना लस दिली जाईल.

रत्नागिरी जिल्ह्यात तूर्त केवळ ४५ वर्षांहून अधिक वयोगटासाठीच लसीकरण होणार

रत्नागिरी : करोनाप्रतिबंधक लसीकरणाचा गोंधळ टाळण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने आता नियोजन केले असून सध्या केवळ ४५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांना नागरिकांनाच लस दिली जाणार आहे. शहरी भागात ऑनलाइन नोंदणीने, तर ग्रामीण भागात केंद्रावर ऑफलाइन पद्धतीने प्रत्यक्ष नोंदणी करून लस दिली जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.