रत्नागिरी जिल्ह्यात आज ७७९० जणांना करोनाप्रतिबंधक डोस

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज, गुरुवार, १३ मे रोजी ग्रामीण आणि शहरी भागातील केंद्रांवर करोनाप्रतिबंधक लसीकरण होणार आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सहा हजार ३९० तर शहरी भागातील १४ केंद्रांमध्ये १४०० अशा एकूण ७ ७९० लोकांना लस दिली जाईल.

ही कोविशील्डची लस आहे. ज्यांनी याआधी कोविशील्डचा पहिला डोस घेतला आहे, त्यांनाच प्रामुख्याने आज दुसरा डोस दिला जाणार आहे. काही डोस शिल्लक राहिल्यास इतर नागरिकांना पहिला डोस दिला जाईल, असे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

ग्रामीण भागात ऑफलाइन पद्धतीने म्हणजे थेट केंद्रावर नोंदणी करून लस दिली जाणार आहे. शहरी भागात मात्र ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केलेल्या नागरिकांनाच लस दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आज होणाऱ्या लसीकरणाचा तपशील असा –

१) मंडणगड (एकूण २७०) – पंदेरी ९०, कुंबळे ९०, देव्हारे ९०.

२) दापोली (एकूण ७२०) – आंजर्ले ९०, केळशी ९०, आसूद ९०, उंबर्ले ९०, साखळोली ९०, फणसू ९०, पिसई ९०.

३) खेड (एकूण ९००) – तळे १२०, कोरेगाव ९०, फुरूस १५०, आंबवली १४०, वावे ९०, लोटे १३०, शिव बुद्रुक ९०, तिसंगी ९०.

४) गुहागर (एकूण ४८०) – आबलोली ९०, कोळवली १२०, हेदवी ९०, तळवली ९०, चिखली ९०.

५) चिपळूण (एकूण ८१०) – रामपूर ९०, कापरे ९०, खरवते ९०, दादर ९०, अडरे ९०, शिरगाव ९०, सावर्डे ९०, फुरूस ९०, वहाळ ९०.

६) संगमेश्वर (एकूण ९९०) – माखजन ९०, कडवई ९०, वांद्री ९०, कोंडउमरे ९०, फुणगूस ९०, धामापूर ९०, साखरपा ९०, सायले ९०, बुरंबी ९०, देवळे ९०, निवे ९०.

७) रत्नागिरी (एकूण ८४०) – कोतवडे ९०, मालगुंड ९०, वाटद ९०, जाकादेवी ९०, पावस १७०, चांदेराई ९०, खानू ९०, हातखंबा १३०.

८) लांजा (एकूण ५४०) – भांबेड ९०, शिपोशी ९०, साटवली ९०, वाडीलिंबू ९०, जावडे ९०, रिंगणे ९०.

९) राजापूर (एकूण ८४०) – करक-कारवली ९०, केळवली ९०, जवळेथर ९०, फुफेरे ९०, ओणी ९०, जैतापूर ९०, कुंभवडे ९०, सोलगाव १२०, धारतळे ९०.
………
याशिवाय सर्व नऊ तालुक्यांच्या ठिकाणी शहरी भागातएकूण १४ केंद्रांवर प्रत्येकी १०० डोस दिले जाणार आहेत. ही केंद्रे अशी –
मंडणगड – नूतन हायस्कूल.
दापोली – सोहोनी विद्यामंदिर.
खेड – सहजीवन हायस्कूल.
गुहागर – जीवन शिक्षण मंदिर.
चिपळूण – १) उपप्राथमिक आरोग्य केंद्र -१, २) उपप्राथमिक आरोग्य केंद्र – २.
संगमेश्वर – १) ग्रामीण रुग्णालय, संगमेश्वर, २) ग्रामीण रुग्णालय, देवरूख.
रत्नागिरी – १) मिस्त्री हायस्कूल, २) पटवर्धन हायस्कूल, ३) कोकणनगर उपप्राथमिक आरोग्य केंद्र.
लांजा – लांजा हायस्कूल.
राजापूर – १) ग्रामीण रुग्णालय, राजापूर, २) ग्रामीण रुग्णालय, रायपाटण.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply