रत्नागिरीत आतापर्यंत १७ जण करोनामुक्त; आजचे सर्व अहवाल निगेटिव्ह

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या वाढतच चालली असून, आज (१७ मे) नवे सहा रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या आता ९२वर पोहोचली आहे. सिंधुदुर्गातील दोन रुग्णांना आज बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.

रत्नागिरीतील रुग्णसंख्या ७४वर; आज नवे २२ ‘पॉझिटिव्ह’

रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे नवे २२ रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ७४ वर पोहोचली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील पाचवी महिला करोनाबाधित, रुग्णसंख्या अकरा

रत्नागिरी : जिल्ह्यात आज आणखी एक करोनाबाधित महिला रुग्ण आढळला आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ही माहिती दिली. ती महिला ६५ वर्षांची असून मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी ती गेली होती. तेथून परतल्यानंतर तिला करोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

रत्नागिरीत आढळले दोन नवे करोनाबाधित रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरीत काल रात्री (ता. १ मे) दोन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ही माहिती दिली.

पत्रकारांची सुरक्षा वाऱ्यावरच

राजकारणी लोक आणि प्रशासनाला आपली लोकप्रियता निर्माण करण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी विविध माध्यमांचा चांगला उपयोग होत असतो. त्यासाठीच ही माध्यमे वापरून घेतली जातात. पण करोनाच्या संकटकाळीही त्यांच्या आरोग्याची, आयुष्याची जबाबदारी घेण्याच्या बाबतीत कोणीही पुढाकार घेतलेला नाही. कोणत्याही सामाजिक संस्थांनीही त्याबाबत स्वारस्य दाखविलेले नाही. अर्थातच कुणी आपल्या संरक्षणासाठी पुढे येईल, अशी पत्रकारांचीही अपेक्षा नाही. कारण लोकशाहीचा हा चौथा स्तंभ निरपेक्ष पद्धतीनेच काम करत आहे आणि काम करत राहणार आहे. तूर्त तरी पत्रकारांची सुरक्षा वाऱ्यावरच आहे.