राज्य पातळीवर समन्वयाच्या अभावाची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. जिल्हा पातळीवरसुद्धा हाच समन्वयाचा अभाव झिरपला आहे. त्याची अनेक उदाहरणे देता येतील.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
राज्य पातळीवर समन्वयाच्या अभावाची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. जिल्हा पातळीवरसुद्धा हाच समन्वयाचा अभाव झिरपला आहे. त्याची अनेक उदाहरणे देता येतील.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाग्रस्तांच्या संख्येत आज (२७ मे) १२ रुग्णांची भर पडली आहे. सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये हे स्पष्ट झाले. दरम्यान, आज पाच विद्यार्थिनींना करोनामुक्त झाल्यावर घरी सोडण्यात आले.
सावंतवाडी : क्वारंटाइन असलेल्या एका तरुणाला श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील गुळदुवे गावात ही घटना घडली. मुंबईतील मालाडहून कालच (२६ मे) आपल्या गावात आलेला हा तरुण शाळेत क्वारंटाइन होता. या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही. या मृत युवकाचा स्वॅब नमुना घेऊन त्याचा अहवाल आल्यावर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
रत्नागिरी : काल रात्री (२६ मे) उशिरा आलेल्या अहवालांनुसार, रत्नागिरी जिल्ह्यात आणखी आठ करोनाबाधित रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १८३वर पोहोचली आहे. या आठपैकी सहा जण रत्नागिरीतील, तर दोन जण संगमेश्वरातील आहेत. रत्नागिरीतील सहा जणांपैकी चार जण रत्नागिरीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारांसाठी दाखल आहेत.
देवरूख : करोना संसर्गप्रतिबंधक फेस शील्ड तयार करून देवरूख आणि परिसरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या सुटीचा सदुपयोग केला आहे. करोना प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या प्रचलित फेस शील्डमध्ये असलेले दोष दूर करून त्यांनी हे फेस शील्ड तयार केले आहे. शिवाय ते किफायतशीर किमतीत उपलब्ध करून दिले आहे.
रत्नागिरी : मिरज येथून आज (२५ मे) रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमधील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या आता १६१वर पोहोचली आहे. आतापर्यंत ५५ रुग्णांना उपचारांनंतर पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले असून, चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १०२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात स्वॅब टेस्टिंग लॅब सुरू करायला मान्यता देणारा शासन निर्णय राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आज (२५ मे) जारी केला.