डांगमोडे (मसुरे, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) गावात तीन दिवस तीन ठिकाणी तीन वेगवेगळ्या दिवशी दसरा उत्सव साजरा करण्यात येतो.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
डांगमोडे (मसुरे, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) गावात तीन दिवस तीन ठिकाणी तीन वेगवेगळ्या दिवशी दसरा उत्सव साजरा करण्यात येतो.
देवरूख : राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील मारळ येथील स्वयंभू मार्लेश्वर तीर्थक्षेत्री चि. मार्लेश्वर आणि चि. सौ. कां. गिरीजादेवी यांचा विवाहसोहळा (कल्याणविधी) आज दुपारी १ वाजण्याच्या मुहूर्तावर हजारो भाविकांच्या साक्षीने पार पडला.
प्रसिद्ध लेखक माधव गुणाजी कोंडविलकर यांचं ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ हे पुस्तक आता ‘स्टोरीटेल’ने ऑडिओ बुक स्वरूपात उपलब्ध केलं आहे.
देवरूख : भारतीय स्थलसेना दिनाच्या औचित्याने देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्धी विभाग आणि ग्रंथालय विभागाच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शनपर व्याख्यान पार पडले.
करोना, लॉकडाउन आणि अतिवृष्टीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना नियम पाळून का होईना, पण दसरा उत्साहाने साजरा करायचा होता; देवरुख (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील नागरिकांना मात्र ते शक्य झाले नाही. कारण आधीच लांबलेल्या पावसाने साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याचाही मुहूर्त चुकवला नाही. त्यामुळे नागरिकांच्या उत्साहावर मुसळधार पावसाचे पाणी पडले आणि सोने लुटणे सोडाच, पण पावसानेच जणू देवरुखवासीयांना लुटले, अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली होती.
देवरूख : कोकणातील मुलांना रोजगाराची संधी मिळवून देणारे कोकणातील पहिलेच कौशल्य प्रशिक्षण केंद्र येथील आठल्ये, सप्रे, पित्रे स्वायत्त महाविद्यालयात सुरू होणार आहे. या अभ्यासक्रमाचा प्रारंभ येत्या २६ ऑक्टोबरला होणार आहे.