डांगमोडे गावातील तीन दिवसांचा दसरा महोत्सव

डांगमोडे (मसुरे, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) गावात तीन दिवस तीन ठिकाणी तीन वेगवेगळ्या दिवशी दसरा उत्सव साजरा करण्यात येतो. विजयादशमीला मंदिरात, दुसऱ्या दिवशी बादेवहाळ येथे, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी सड्यावर आकारी ब्राह्मण देवस्थानात दसरा साजरा होतो.

दसऱ्याच्या दिवशी परंपरेनुसार देवळाजवळ असलेल्या आपट्याच्या झाडाखाली गणेशपूजा होऊन शिवलग्न लावण्यात आले. लग्न लावल्यानंतर आपट्याच्या पानांच्या रूपातील सोने लुटले गेले आणि आपापसातील वैर विसरून मैत्रीचे नाते वृद्धिंगत करण्यात आले.

आज, दुसऱ्या दिवशी, १३ ऑक्टोबर रोजी बादेवहाळ येथे ब्राह्मणाचे स्थान आहे. तेथे असलेल्या आपट्याच्या झाडाखाली शिवलग्न लावण्यात येईल. तेथे नैवेद्य उपाहार होईल. ब्राह्मण भोजनाने उत्सवाची सांगता होईल.

उद्या, तिसऱ्या दिवशी, १४ ऑक्टोबर रोजी सड्यावर आकारी ब्राह्मणाचे स्थान आहे. तेथे सर्वजण भेटीस जातील. तेथे ब्राह्मण भोजन होते. नंतर पुन्हा मंदिरात येऊन श्री देव रवळनाथाकडे गाऱ्हाणे घातले जाते. काही चूक झाल्यास माफ कर. आमचा सगळ्यांचा कल्याण कर, अशी प्रार्थना करून तीन दिवसांच्या दसरा महोत्सवाची सांगता होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply