विधवा मातांचा आशीर्वाद घेऊन पन्नासावा वाढदिवस साजरा

जुवाठी (ता. राजापूर) : येथील माध्यमिक विद्यालयाचे सहायक शिक्षक बी. के. गोंडाळ यांनी आपला वाढदिवस जुवाठी गावातील १५ विधवा मातांना साडीचोळी देऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन साजरा केला.

स्वतःच्या हयातीतच पत्नीच्या वैधव्यप्रथा मुक्तीचे प्रतिज्ञापत्र

राजापूर : विधवांना समाजात चांगले स्थान देण्याची चळवळ सुरू झाली आहे. विधवांना सन्मानाने जगता यावे, यासाठी ठिकठिकाणच्या ग्रामपंचायती ठराव करत आहेत. त्यातील एक पुढचे पाऊल राजापूर तालुक्यातील एका शिक्षकाने उचलले आहे. स्वतःच्याच हयातीत आपल्या पत्नीला वैधव्यप्रथेतून मुक्त करण्याचे प्रतिज्ञापत्र या शिक्षकाने केले आहे.

श्यामची आई, शिवाजी कोण होता? पुस्तकांचे वाटप

कणकवली : येथे राष्ट्र सेवा दल शिबिरातील विद्यार्थ्यांना जुवाठी (ता. राजापूर) येथील माध्यमिक शिक्षक बी. के. गोंडाळ यांनी श्यामची आई तर प्रमुख अतिथींना शिवाजी कोण होत? हे पुस्तक भेट दिले.

दोघा छोट्या मुलींनी उघडली ज्ञानाची कवाडे

राजापूर : जुवाठी (ता. राजापूर) येथे सान्वी आणि भूमी या दोन छोट्या मुलींनी ज्ञानाची कवाडे उघडली. स्वतःसह इतर बालमित्रमैत्रिणींनाही उपयुक्त ठरणार असलेल्या गंमत जंमत बालवाचनालयाचे उद्घाटन त्या दोघींनी केले.

जुवाठी येथे १५ मेपासून आगळेवेगळे गम्मत जम्मत बालवाचनालय

राजापूर : मुलांना वाचनाची गोडी लागावी, यासाठी पाऊणशे वर्षे वयाच्या वाचनवेड्याने जुवाठी (ता. राजापूर) येथे आगळेवेगळे गम्मत जम्मत बालवाचनालय चालविले आहे.

सेवा दलाची पंचतत्त्वे घराघरात पोहोचावीत : शहाजीराव खानविलकर

राजापूर : सेवादलाची पंचतत्त्वे राष्ट्र सेवादल शिबिरार्थींच्या माध्यमातून घराघरात पोहोचावीत. त्यासाठी शिक्षणाची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत ओणी (ता. राजापूर) येथील नूतन विद्यामंदिरचे माजी मुख्याध्यापक शहाजीराव भाऊराव खानविलकर यांनी मांडले.