नाकावाटे ब्रेन ट्यूमर काढणारे न्यूरो नेव्हिगेशन तंत्रज्ञान ठरतेय वरदान; रत्नागिरीत १७ मे रोजी विशेष शिबीर

ठाण्यातील सोलारिस सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलने अत्याधुनिक न्यूरो नेव्हिगेशन तंत्रज्ञानाच्या साह्याने आतापर्यंत ब्रेन ट्यूमरच्या १००हून अधिक रुग्णांना जीवनदान दिले आहे. या तंत्रज्ञानामुळे मेंदू/कवटी न उघडता अचूकपणे शस्त्रक्रिया करता येत असल्याने रुग्णाला कमीत कमी त्रास होतो. मणक्याच्या विकारांवरही याद्वारे उपचार करता येतात. सोलारिस हॉस्पिटलतर्फे रत्नागिरी नगर परिषदेच्या सहकार्याने मेंदू आणि मणक्याच्या आजारांविषयीचे (न्यूरॉलॉजी अँड स्पाइन) मोफत वैद्यकीय शिबीर रविवारी, १७ मे २०२६ रोजी रत्नागिरीत आयोजित करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचा बालवाचक कट्टा सुरू

रत्नागिरी : रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने मुलांसाठी सुरू केलेल्या ‘बालवाचन कट्टा’ या अभिनव योजनेला पहिल्या दिवसापासूनच मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. हा उपक्रम १० जून २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.

नैरोबीत घुमला मराठीचा आवाज

रत्नागिरी : पूर्व आफ्रिकेतील नैरोबी (केनिया) येथे महाराष्ट्रातून गेलेल्या मराठी बांधवांचा मराठीचा आवाज घुमला. दुसरे जागतिक मराठी भाषा साहित्य संमेलन तेथे उत्साहात पार पडले.

दापोलीत ९-१० मे रोजी समर सायक्लोथॉन

दापोली : दापोलीत येत्या ९ आणि १० मे रोजी समर सायक्लोथॉन आयोजित करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह नगर वाचनालयाचा बालवाचकांसाठी टेरेस वाचनालय उपक्रम

रत्नागिरी : शाळांच्या सुट्या सुरू झाल्या असून बालगोपाळांच्या आनंदात भर घालण्यासाठी रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय बालगोपाळांसाठी टेरेस वाचनालयाच्या उपक्रमातून पुस्तक खजिना उपलब्ध करून देणार आहे.

अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय सुवर्णमहोत्सव सांगता समारंभ

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीमध्ये क्लस्टर विद्यापीठ होण्याची क्षमता आहे. त्यामुळे संस्थेने त्यासाठी आवश्यक प्रस्ताव शासनाला पाठवून त्याचा पाठपुरावा करावा, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज (चार मे) रत्नागिरीत केले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात ते बोलत होते.