रानभाज्यांवर प्रक्रियेच्या दृष्टीने हवं संशोधन; व्यावसायिक उपयोगासाठी करावेत वेगळे प्रयोग : उदय सामंत

‘रानभाज्यांचे गुणधर्म लक्षात घेता, त्या केवळ महोत्सवापुरत्या मर्यादित राहू नयेत. त्यांचा वापर वर्षभर करता येण्याच्या दृष्टीने प्रक्रिया करण्यासंदर्भात संशोधन होण्याची गरज आहे. त्यावर कृषी विद्यापीठांनी लक्ष केंद्रित करावं,’ अशी अपेक्षा रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केली.

रत्नागिरी चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे पंधरावा श्रावण कीर्तन सप्ताह

रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण महिन्याचे औचित्य साधून कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तन सप्ताहाचे हे सलग पंधरावे वर्ष आहे.

चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरचे २२ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता चौथीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरच्या २२ विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान पटकावले.

रत्नागिरीत १६ ऑगस्टला ‘स्वरभास्कर’ बैठकीत चैतन्य, विशारद आणि नूपुर यांची मैफील

रत्नागिरी : भारतीय शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा जपणे व उमद्या शास्त्रीय गायकांसाठी व्यासपीठ निर्माण करणे या उद्देशाने आर्ट सर्कल फाउंडेशन आणि सेंटर फॉर रिसर्च अँड प्रमोशन ऑफ इंडियन म्युझिक (CRPIM) यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत येत्या १६ ऑगस्ट रोजी विशेष स्वरभास्कर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

विलास रहाटे यांची ‘नाबार्ड’ कार्यालयातील रांगोळी लक्षवेधी

देवरूख : देवरूखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांनी मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील नाबार्ड अर्थात राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या मुख्य कार्यालयात राष्ट्रीय हातमाग दिनाच्या निमित्ताने साकारलेली रांगोळी लक्षवेधी ठरली आहे.

सुंदर पत्र लिहा, ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळवा

रत्नागिरी : भारतीय टपाल विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय स्तरावरील ‘ढाई आखर’ पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देशपातळीवरील सुंदर पत्राला ५० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.