जीवनाची ध्येये ठरवून केला त्यांच्या पूर्तीचा संकल्प; आगाशे विद्यामंदिरात तिसरीच्या विद्यार्थ्यांचा संकल्पदिन

उद्याचे जबाबदार नागरिक घडवायचे असतील, तर लहान वयातच त्यांना योग्य ध्येयांची दिशा मिळायला हवी. तसेच, त्या दिशेने जाण्याचा दृढ संकल्प केल्यास त्यांची वाटचाल सुकर होते. म्हणून संकल्पाचे महत्त्व मुलांच्या मनावर ठसण्याकरिता रत्नागिरीतील भारत शिक्षण मंडळाच्या कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात दर वर्षीप्रमाणे यंदाही तिसरीच्या विद्यार्थ्यांकरिता १८ जुलै २०२६ रोजी संकल्पदिन साजरा करण्यात आला.

टिळक आळी गणेशोत्सव मंडळातर्फे रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

रत्नागिरी : येथील १०१ वर्षांच्या टिळक आळी गणेशोत्सव मंडळातर्फे दि. ३१ जुलै ते १ व २ ऑगस्ट, २०२६ या कालावधीत येथील वैद्य मंगल कार्यालयात दुसरी रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २१वे मरणोत्तर देहदान

रत्नागिरी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नाचणे (रत्नागिरी) येथील मंगल जोगळेकर यांनी मरणोत्तर देहदान केले.

दहिवली दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या दोघांचे मृतदेह सापडले

खेड तालुक्यातल्या दहिवली-शेलारवाडीत काल रात्री झालेल्या भूस्खलन दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या दोन व्यक्तींचे मृतदेह हाती लागले आहेत.

खेडमधील दहिवलीत भूस्खलन; बेपत्ता दोघांना शोधण्याचे काम युद्धपातळीवर

खेड तालुक्यातल्या दहिवलीमध्ये डोंगराचा भाग खचून दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना काल रात्री (सहा जुलै) घडली असून, प्रशासन आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी मदतकार्य करत आहे.

कातळशिल्पांचे पूर्ण संरक्षण करूनच विकास प्रकल्पांचा विचार : आशिष शेलार

मानवी उत्क्रांतीच्या इतिहासाचे महत्त्वाचे पुरावे असलेल्या कोकणातील कातळशिल्पांचे पूर्ण संरक्षण करूनच भविष्यातील या भागातील विकास प्रकल्पांचे नियोजन करण्यात येईल, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी आज (७ जुलै) विधानसभेत दिली.