झोंपाळ्यावरची गीता : जशी आहे तशी

राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी झोंपाळ्यावरच्या गीतेचा केलेला समश्लोकी इंग्रजी अनुवाद गीता जयंतीच्या मुहूर्तावर प्रसिद्ध होत आहे.

गीता जयंतीदिनी ‘झोंपाळ्यावरची गीता’च्या इंग्रजी अनुवादाचे रत्नागिरीत प्रकाशन; कोकण मीडियाच्या स्पर्धांचे बक्षीस वितरणही होणार

रत्नागिरी : येत्या शनिवारी, तीन डिसेंबर २०२२ रोजी गीता जयंतीचे औचित्य साधून रत्नागिरीत The Geeta in Leisure या पुस्तकाचे आणि ई-बुकचे प्रकाशन होणार आहे. १९१७ साली कवी अनंततनय यांनी लिहिलेल्या ‘झोंपाळ्यावरची गीता’ या पुस्तकाचा हा इंग्रजी अनुवाद रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजेंद्रप्रसाद स. मसुरकर यांनी केला आहे. रत्नागिरीच्या सत्त्वश्री प्रकाशनातर्फे (कोकण मीडिया) हे पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे. तसेच, साप्ताहिक कोकण मीडियाने २०२२च्या दिवाळी अंकासाठी ‘कोकणातील उत्सव’ या विषयावर घेतलेल्या लेख आणि चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभही या वेळी होणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकताय? तो गुन्हा आहे!

रत्नागिरी : सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यासारखी कृतीसुद्धा गुन्हाच असते. असे अनेक गुन्हे नकळत घडत असतात. त्याविषयी मंडणगडमधील वकील अॅड. यश घोसाळकर यांनी लिहिलेल्या ‘डोन्ट डू इट’ पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

हिंदूंची ताकद एकीमध्येच – उदय गोविलकर

रत्नागिरी : ब्राह्मण आणि समस्त हिंदूंनीही एकत्र आले पाहिजे. आपली ताकद एकीमध्येच आहे, असे प्रतिपादन दापोलीच्या ब्राह्मण हितवर्धिनी पतसंस्थेचे संस्थापक, ब्राह्मण हितवर्धिनी सभेचे अध्यक्ष उदय गोविलकर यांनी केले.

रत्नागिरीत विश्व संवाद केंद्रातर्फे नागरी पत्रकारिता कार्यशाळा

रत्नागिरी : मुंबईतील विश्व संवाद केंद्रातर्फे आज महाविद्यालयीन व व्यावसायिक तरुण-तरुणी यांच्याकरिता झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवनात नागरी पत्रकारिता कार्यशाळा झाली.

मु. पो. किन्नोर : निरर्थक नि अन्याय्य रूढींविरोधातील बंडाची कथा

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हौशी राज्य नाट्य स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी साठावी म्हणजे हीरक महोत्सवी स्पर्धा २१ फेब्रुवारीला सुरू झाली आहे. या स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात प्राथमिक फेरीतील नाटके २२ फेब्रुवारीपासून सादर होत आहेत. २७ फेब्रुवारीला सादर झालेल्या `मु. पो. किन्नोर` या नाटकाचा हा परिचय…