मामलेदार केशव जोशींच्या देशप्रेमामुळेच वाचले चिरनेरचे सत्याग्रही

चिपळूण : ब्रिटिशांच्या नोकरीत असतानाही सत्याग्रहींवर गोळीबार करायचा नाही, असे आदेश देऊनही चिरनेर (जि. रायगड) येथे जंगल सत्याग्रहावेळी तेव्हाचा पोलिस इन्स्पेक्टर पाटील याने गोळीबार केला. त्याला अडवताना मामलेदार केशव जोशी त्याच्या गोळीला बळी पडले, पण त्यामुळे शेकडो सत्याग्रहींचे प्राण वाचले, असे प्रतिपादन संध्या साठे-जोशी यांनी केले.

चिपळूण बचाव समितीला ‘गात जा अभंग’ पुरस्कार

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयातर्फे कविवर्य द्वारकानाथ शेंडे यांच्या देणगीतून देण्यात येणारा ‘गात जा अभंग’ हा सामाजिक कार्यासाठीचा यावर्षीचा पुरस्कार चिपळूण बचाव समितीला देण्यात येणार आहे.

हुतात्मा केशव महादेव जोशी यांच्या तैलचित्राचे रविवारी चिपळूणला अनावरण

चिपळूण : खानू (ता. रत्नागिरी) येथील क्रांतीवीर केशव महादेव जोशी यांच्या तैलचित्राचे अनावरण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या कलादालनात येत्या रविवारी (दि. २५ सप्टेंबर) हस्ते होणार आहे.

पुण्यातील सभागृहासाठी चिपळूणमधून माधव ज्युलियन यांचे तैलचित्र

चिपळूण : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुण्यातील माधवराव पटवर्धन सभागृहात लावण्यासाठी माधवराव पटवर्धन तथा माधव ज्युलियन यांचे तैलचित्र येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे भेट म्हणून देण्यात आले.

‘१९४२ चिपळूण’मधून चिपळूणच्या इतिहासाची माहिती – आमदार शेखर निकम

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे ऑगस्ट क्रांतिदिनी ‘१९४२ चिपळूण’ या पुस्तकाचे प्रकाशन थाटात झाले.

लोकमान्य टिळक स्मारक, चिपळूण पालिकेतर्फे स्फूर्तिगीत स्पर्धा

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि चिपळूण नगरपालिकेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्फूर्तिगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.