चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयातर्फे कविवर्य द्वारकानाथ शेंडे यांच्या देणगीतून देण्यात येणारा ‘गात जा अभंग’ हा सामाजिक कार्यासाठीचा यावर्षीचा पुरस्कार चिपळूण बचाव समितीला देण्यात येणार आहे.
चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी गेल्यावर्षी या समितीने आंदोलन केले होते. त्यामुळे शासनाला जाग येऊन वाशिष्ठी नदी गाळमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. त्याचा परिणामही झाला. यावर्षी चिपळूण शहरात पुराचे विशेष पाणी आले नाही. समितीच्या संघर्षाचे हे योगदान आहे. म्हणून लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या संचालक मंडळाने हा पुरस्कार चिपळूण बचाव समितीला देण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे.
पुरस्काराचे स्वरूप दहा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे आहे. लवकरच या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याचे वाचनालायतर्फे कळविण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

