आत्मनिर्भर भारत या वीस लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा सर्वसामान्यांना कितपत फायदा झाला, याची माहिती पत्रकारांनी विचारली. त्याला मात्र समर्पक उत्तर मिळू शकले नाही. योजना जाहीर करण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. त्याची अंमलबजावणी राज्य सरकारने केली पाहिजे. पण राज्य सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहे, अशी टीका नेहमीप्रमाणेच यावेळी करण्यात आली. तसे असेल, तर अशा पत्रकार परिषदा घेऊन केंद्र सरकारच्या चांगल्या योजनांची माहिती कशासाठी दिली पाहिजे? कारण ती वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध होण्यापलीकडे काहीही साध्य होणार नाही. अनेक योजनांच्या बाबतीत आतापर्यंत तसेच घडले आहे. योजनांसाठी प्रचंड खर्च होतो. गाजावाजा होतो. प्रत्यक्षात ज्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे, त्यांच्यापर्यंत योजनेची साधी माहितीही पोहोचत नाही.
Like this:
Like Loading...