स्त्रीचे माणूसपण नाकारणाऱ्या परंपरांना नाकारायला हवे : सरिता पवार

राजापूर : स्त्रीतील माणूसपण नाकारणाऱ्या परंपरांना आपण नाकारायला हवे, असे आवाहन कणकवलीतील राष्ट्र सेवा दलाच्या सामाजिक कार्यकर्त्या, ज्येष्ठ साहित्यिक सरिता पवार यांनी केले.

ग्रामीण भागात तंत्रशिक्षण आणि संगणक शिक्षणावर भर द्यावा – प्रभुदेसाई

रत्नागिरी : यापुढील काळात कुरतडे गावासारख्या ग्रामीण भागात तंत्रशिक्षण आणि संगणक शिक्षणावर भर दिला पाहिजे, अशी अपेक्षा पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी व्यक्त केली.

वाढदिवसानिमित्ताने ३३८ प्राथमिक शाळांना श्यामची आई पुस्तक भेट

राजापूर तालुक्यातील शिक्षक अक्षरमित्र बी. के. गोंडाळ यांनी आपल्या ५० व्या वाढदिवसानिमित्त ३३८ प्राथमिक शाळांमध्ये श्यामची आई हे पुस्तक भेट म्हणून दिले.

स्वतःच्या हयातीतच पत्नीच्या वैधव्यप्रथा मुक्तीचे प्रतिज्ञापत्र

राजापूर : विधवांना समाजात चांगले स्थान देण्याची चळवळ सुरू झाली आहे. विधवांना सन्मानाने जगता यावे, यासाठी ठिकठिकाणच्या ग्रामपंचायती ठराव करत आहेत. त्यातील एक पुढचे पाऊल राजापूर तालुक्यातील एका शिक्षकाने उचलले आहे. स्वतःच्याच हयातीत आपल्या पत्नीला वैधव्यप्रथेतून मुक्त करण्याचे प्रतिज्ञापत्र या शिक्षकाने केले आहे.

श्यामची आई, शिवाजी कोण होता? पुस्तकांचे वाटप

कणकवली : येथे राष्ट्र सेवा दल शिबिरातील विद्यार्थ्यांना जुवाठी (ता. राजापूर) येथील माध्यमिक शिक्षक बी. के. गोंडाळ यांनी श्यामची आई तर प्रमुख अतिथींना शिवाजी कोण होत? हे पुस्तक भेट दिले.

दोघा छोट्या मुलींनी उघडली ज्ञानाची कवाडे

राजापूर : जुवाठी (ता. राजापूर) येथे सान्वी आणि भूमी या दोन छोट्या मुलींनी ज्ञानाची कवाडे उघडली. स्वतःसह इतर बालमित्रमैत्रिणींनाही उपयुक्त ठरणार असलेल्या गंमत जंमत बालवाचनालयाचे उद्घाटन त्या दोघींनी केले.