सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीने येत्या २९ एप्रिल रोजी पहिला जनता आरोग्य दरबार आयोजित केला आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीने येत्या २९ एप्रिल रोजी पहिला जनता आरोग्य दरबार आयोजित केला आहे.
मंडणगड : मंडणगडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचे उद्घाटन देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज (१२ ऑक्टोबर) मंडणगडमध्ये केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंडणगडमध्ये केलेल्या कारवाईत दोन लाचखोर अधिकारी आणि एका शिपायाला ताब्यात घेण्यात आलं आहे. तीस हजार रुपयांची लाच घेताना त्यांना पकडण्यात आलं असून, त्याआधी त्यांनी ४५ हजार रुपयांची लाच ऑनलाइन स्वीकारली होती.
संपूर्ण कोकणातील प्रत्येक गाव पर्यटनस्थळ आहे, असे म्हटले जाते. तसेच निसर्गसौंदर्य प्रत्येक गावाला मिळाले आहे. मात्र पर्यटक प्रत्येक गावाला भेट देईलच, अशी शक्यता नाही. ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भ असलेली अनेक गावे कोकणात आहेत. या गावांना पर्यटक भेटी देत असतात. पण त्या स्थळाविषयीची माहिती त्यांना एकत्रितरीत्या उपलब्ध होत नाही. सोशल मीडियाच्या आजच्या जमान्यात ही माहिती पर्यटक वेगवेगळ्या माध्यमांमधून मिळवत असतात. मात्र ती सर्व माहिती अचूक असेलच असे नाही. मालगुंड हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून जाहीर झाल्यानंतर आता या गावाच्या पुढाकाराने ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे.
मंडणगडमधील नव्या औद्योगिक वसाहतीची घोषणा करण्यात आली आहे. या वसाहतीमुळे स्थलांतर रोखले जाणार असल्याचा मुद्दा योगेश कदम यांनी मांडला आहे. हा मुद्दा किती हास्यास्पद आहे, हे सांगण्याची गरजच नाही. तसे नसेल तर आजपर्यंत झालेल्या नवनव्या उद्योगांच्या घोषणा, त्यांची अंमलबजावणी, त्याद्वारे उभारले गेलेले नवे उद्योग आणि तेथे रोजगार मिळाल्यामुळे किती प्रमाणात बेरोजगारी कमी झाली याचीही मोजदाद व्हायला हवी. कोकणातून मुंबई-पुण्याकडे होणारे स्थलांतर किती प्रमाणात रोखले गेले, याची टक्केवारीही त्यातून उघड होऊ शकेल.
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज (१७ एप्रिल) जिल्हा नियोजन समिती सभागृहात जनता दरबार आयोजित केला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.