महामानवाच्या आंबडवे गावातील प्रत्येक कुटुंब होणार आत्मनिर्भर

निसर्ग चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या आंबडवे गावातील नागरिकांना पुन्हा नव्याने स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ (डिक्की), खादी ग्रामोद्योग मंडळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ (बाटू) या संस्था एकत्र आल्या आहेत. हे गाव दत्तक घेत असल्याची घोषणा ‘डिक्की’चे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी काल (१८ जून) आंबडवे येथे केली. प्रत्येक घरातल्या प्रत्येक हाताला उद्योग, त्यासाठीचा कच्चा माल, निर्मितीचे प्रशिक्षण आणि पक्का माल खरेदीची हमी अशी सर्वांगीण योजना त्यासाठी तयार करण्यात आली आहे.

दलित इंडियन चेंबर करणार आंबडवे गावाचे पुनर्वसन

रत्नागिरी : दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिक्की) या संस्थेने आंबडवे (ता. मंडणगड) या बाबासाहेब आंबेडकरांच्या चक्रीवादळाचा मोठा फटका बसलेल्या गावाचे पुनर्वसन करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी संस्थेचे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे गुरुवारी (ता. १८) स्वतः गावाला भेट देणार आहेत.

कोकणातील शिमगोत्सव : मंडणगडचा वैशिष्ट्यपूर्ण ‘डेरा’

‘डेरा’ हा लोककला प्रकार रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेकडील मंडणगड तालुक्यात आढळतो. शिमग्याच्या दिवसांत मंडणगडजवळील पाट या गावातील गवळी समाजाचे लोक हे सादर करतात. हे लोक शिमग्यात घरोघर फिरतात. अन्यत्र कोठे हा प्रकार आढळत नाही. त्या लोककलेची माहिती देणारा हा लेख…